Join us
Daily Top 2Weekly Top 5

रिझर्व्ह बँकेच्या बैठकीआधी सेन्सेक्स किंचित वाढला

By admin | Updated: June 1, 2015 23:58 IST

रिझर्व्ह बँक मंगळवारी पतधोरण आढावा जाहीर करणार आहे. तत्पूर्वी आज सोमवारी शेअर बाजारात अल्प प्रमाणात संमिश्र कल दिसून आला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २0.५५ अंकांनी वाढून

मुंबई : रिझर्व्ह बँक मंगळवारी पतधोरण आढावा जाहीर करणार आहे. तत्पूर्वी आज सोमवारी शेअर बाजारात अल्प प्रमाणात संमिश्र कल दिसून आला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २0.५५ अंकांनी वाढून २७,८४८.९९ अंकांवर बंद झाला. भारताची अर्थव्यवस्था ७.३ टक्क्यांनी वाढत असल्याची आकडेवारी जाहीर झाली आहे. तसेच कारखाना उत्पादनात मे महिन्यात मोठी वाढ झाल्याचेही स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर बाजारात तेजीचे वातावरण दिसून आले. ३0 कंपन्यांचा समावेश असलेला सेन्सेक्स सकाळी २७,९५९.४३ अंकांवर उघडला होता. नंतर मात्र नफा वसुलीचा फटका बसून तो २७,७७३.५८ अंकांपर्यंत घसरला. सत्र अखेरीस २0.५५ अंकांची अथवा 0.0७ टक्क्यांची वाढ नोंदवून तो २७,८४८.९९ अंकांवर बंद झाला. शुक्रवारी सेन्सेक्सने ३२१.७३ अंक कमावले होते. ५0 कंपन्यांचा समावेश असलेला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 0.२५ अंकांनी घसरून ८,४३३.४0 अंकांवर बंद झाला. जागतिक बाजारांतही संमिश्र कल दिसून आला. आशियाई बाजारांपैकी चीनमधील बाजार तेजीत होते. युरोपीय बाजार अंशत: घसरण दर्शवीत होते.