Join us

सहा आठवड्यांच्या उच्चांकावर सेन्सेक्स

By admin | Updated: January 20, 2015 02:30 IST

विप्रोच्या नेतृत्वाखाली सॉफ्टवेअर कंपन्यांची चांगली कामगिरी केल्यामुळे भारतीय शेअर बाजारांनी सोमवारी पुन्हा एकदा उसळी घेतली.

मुंबई : विप्रोच्या नेतृत्वाखाली सॉफ्टवेअर कंपन्यांची चांगली कामगिरी केल्यामुळे भारतीय शेअर बाजारांनी सोमवारी पुन्हा एकदा उसळी घेतली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १४0.१२ अंकांनी वाढून ६ आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा सीएनएक्स निफ्टीही ३६.९0 अंकांनी वाढला. चीनमधील शेअर बाजारांना २00८ नंतरच्या सर्वाधिक घसरणीचा फटका बसला. असे असतानाही भारतीय बाजारांनी तेजी साजरी केली. कंझ्युमर ड्युरेबल्स, कॅपिटल गुडस्, फार्मा आणि पॉवर या क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांना चांगली मागणी राहिली. भारताची सर्वांत मोठी सॉफ्टवेअर कंपनी विप्रोने गेल्या शुक्रवारी जाहीर केलेली आकडेवारी उत्साहवर्धक होती. त्याचा परिणाम म्हणून सोमवारी कंपनीचे समभाग ५.२६ टक्क्यांनी वाढले. त्याचा बाजारावर सकारात्मक परिणाम दिसून आला. गेल्या शुक्रवारी वॉल स्ट्रीटही तेजीत होता. त्याचाही बाजारावर परिणाम झाला. विप्रोशिवाय आयसीआयसीआय बँक, टाटा मोटर्स, अ‍ॅक्सिस बँक, आरआयएल, एलअँडटी, एमअँडएम, सन फार्मा, भारती एअरटेल, गेल आणि भेल या कंपन्यांचे समभाग वाढले. एचयूएल, एचडीएफसी, टीसीएस, इन्फोसिस, एसबीआय, हीरोमोटोकॉर्प यांचे समभाग मात्र घसरले.३0 कंपन्यांचा समावेश असलेला सेन्सेक्स सकाळी तेजीने उघडला. त्यानंतर तो सतत तेजीतच राहिला. सत्र अखेरीस २८,२६२.0१ अंकांवर बंद झाला. सेन्सेक्सला १४0.१२ अंकांचा अथवा 0.५0 टक्क्यांचा लाभ मिळाला. ५ डिसेंबर २0१४ रोजी सेन्सेक्स २८,४५८.१ अंकांवर बंद झाला होता. त्यानंतरचा सर्वाधिक चांगला बंद आजचा राहिला. गेल्या सलग ३ सत्रांत सेन्सेक्स तेजीत आहे. या ३ सत्रांत सेन्सेक्सने ९१५.१९ अंकांची वाढ मिळविली आहे. ही वाढ ३.३५ टक्के आहे. ५0 कंपन्यांचा समावेश असलेला सीएनएक्स निफ्टी ३६.९0 अंक अथवा 0.४३ टक्क्यांनी वाढून ८,५५0.७0 अंकांवर बंद झाला. निफ्टीची ही दीड महिन्यातील सर्वोच्च पातळी आहे.गेल्या शुक्रवारी विदेशी संस्थांनी १0९९.९३ कोटी रुपयांची शेअर खरेदी केली. (प्रतिनिधी)४आशियाई बाजारांत संमिश्र कल पाहायला मिळाला. जपान, सिंगापूर, दक्षिण कोरिया, तैवान येथील बाजार 0.२१ टक्के ते 0.८९ टक्के वाढले. ४चीनचा शेअर बाजार मात्र तब्बल ७.७0 टक्क्यांनी घसरला. हाँगकाँगचा बाजार १.५१ टक्क्यांनी घसरला. ४नवी दिल्ली : देशातील व्यापक आर्थिक सुधारणा राबविली जाण्याची शक्यता आहे. नोमुराच्या एका अहवालात चालू वर्षअखेरीपर्यंत मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ३३,५०० अंकांची पातळी गाठेल.४जपानी ब्रोकरेज कंपनी नोमुराने आपला अंदाज गेल्या वर्षभरात देशात झालेल्या व्यापक आर्थिक सुधारणात्मक वातावरणावर आधारित असल्याचे म्हटले आहे.४आर्थिक सुधारणात्मक वातावरण टिकाऊ असून यात आगामी काळात आणखी चांगली स्थिती तयार होईल.४नोमुराच्या विश्लेषणानुसार, डिसेंबर २०१५ च्या अखेरीपर्यंत आमच्या मते सेन्सेक्स ३३,५०० अंकांपर्यंत झेपावेल. सध्याच्या पातळीवरून यात २० टक्के वाढ होईल.