Join us

सेन्सेक्स २९१ अंकांनी वधारला

By admin | Updated: April 25, 2017 00:32 IST

खरेदीचा जोर वाढल्यामुळे सोमवारी मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स, तसेच राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हे दोन्ही निर्देशांक मोठ्या वाढीसह बंद झाले.

मुंबई : खरेदीचा जोर वाढल्यामुळे सोमवारी मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स, तसेच राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हे दोन्ही निर्देशांक मोठ्या वाढीसह बंद झाले. ३0 कंपन्यांचा समावेश असलेला सेन्सेक्स २९0.५४ अंकांनी अथवा 0.९९ टक्क्यांनी वाढून २९,६५५.८४ अंकांवर बंद झाला. ही सुमारे सहा आठवड्यांतील सर्वांत मोठी एकदिवसीय वाढ ठरली, तसेच ११ एप्रिलनंतरचा सर्वोच्च बंद ठरला. शुक्रवारी सेन्सेक्स ५७.0९ अंकांनी घसरला होता. ५0 कंपन्यांचा समावेश असलेला निफ्टी ९८.५५ अंकांनी अथवा १.0८ टक्क्यांनी वाढून ९,२१७.९५ अंकांवर बंद झाला. आरआयएलचे समभाग १.१९ टक्क्यांनी वाढले. एचडीएफसी बँकेच्या समभागांतील वाढही कायम राहिली. सिमेंट क्षेत्रातील मोठी कंपनी एसीसीला खरेदीदारांकडून चांगला पाठिंबा मिळाला. वाढ मिळविणाऱ्या अन्य कंपन्यांत गेल, अ‍ॅक्सिस बँक, एल अँड टी, मारुती सुझुकी, एचडीएफसी लि., अदाणी पोर्टस्, टाटा मोटर्स, भारती एअरटेल, ओएनजीसी, बजाज आॅटो, टीसीएस आणि आयटीसी यांचा समावेश आहे.शुक्रवारच्या सत्रात विदेशी संस्थांनी मोठ्या प्रमाणात समभाग विक्री केल्याचे दिसून आले. ९७८.३४ कोटी रुपयांचे समभाग त्यांनी विकले. याउलट देशांतर्गत भांडवली कंपन्यांनी १,१३२.३९ कोटींचे समभाग खरेदी केले. (वाणिज्य प्रतिनिधी)