Join us

सेन्सेक्स १८१ अंकांनी वधारला

By admin | Updated: July 13, 2016 02:34 IST

मंगळवारी मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १८१ अंकांनी वधारून २७,८0८ अंकांवर गेला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ८,५00 अंकांवर गेला आहे.

 मुंबई : मंगळवारी मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १८१ अंकांनी वधारून २७,८0८ अंकांवर गेला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ८,५00 अंकांवर गेला आहे. दोन्ही निर्देशांक ११ महिन्यांच्या उच्चांकावर गेले आहेत. १८१.४५ अंकांच्या अथवा 0.६६ टक्क्यांच्या वाढीसह २७,८0८.१४ अंकांवर बंद झाला. काल सेन्सेक्स ५00 अंकांनी वाढला होता. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ५३.१५ अंकांनी अथवा 0.६३ टक्क्यांनी वाढून ८,५२१ अंकांवर बंद झाला. सेन्सेक्समधील ३0 कंपन्यांपैकी १९ कंपन्यांचे समभाग वाढीसह बंद झाले. (प्रतिनिधी)