मुंबई : सेन्सेक्सने सोमवारी २१७ अंकांनी उसळी घेत २५,३३५.९० ची पायरी गाठली. बँकिंगमधील उलाढाली, जागतिक बाजारातील सकारात्मक व सोने भाव वाढीचा परिणाम सेन्सेक्स वधारण्यात झाला.नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या (एनएसई) निफ्टीनेही ७,८०० अंक प्राप्त केले. वस्तू व सेवाकर (जीएसटी) विधेयकावरून निर्माण झालेली संभ्रमावस्था व कमकुवत सुरुवातीनंतर सेन्सेक्स २१६.६८ अंकांनी (०.८५ टक्के) उसळून २५,७३५.९० वर गेला. सरकारने २०१५ - १६ वर्षासाठी विकासदराचे भाकीत ८.१ ते ८.५ वरून ७ ते ७.५ टक्के असे केल्यानंतर शुक्रवारी सेन्सेक्स पाच दिवसांत प्रथमच खाली आला होता. अमेरिकन चलनाच्या तुलनेत रुपया ६६.३५ अशा चांगल्या अवस्थेला होता. शिवाय आयसीआयसीआय बँकेला झालेला ३.२४ टक्के, ओएनजीसीचा ३.१६, आयटीसी २.६८ आणि एमअँडएम, हीरो मोटोकॉर्प, अॅक्सिस बँक व स्टेट बँक आॅफ इंडियाला झालेला फायदा सेन्सेक्सला फायदेशीर ठरला.
सेन्सेक्सची २१७ अंकांची उसळी
By admin | Updated: December 22, 2015 02:44 IST