नवी दिल्ली : मर्यादित व्यवहारांमुळे गुरुवारी राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात मरगळ दिसून आली. सोन्याचा भाव २0 रुपयांनी स्वस्त होऊन २७,0५0 रुपये तोळा झाला. चांदीचा भाव मात्र आदल्या दिवशीच्या पातळीवर म्हणजे ३७,३00 रुपये किलोवर कायम राहिला.देशांर्गत परिस्थिती प्रतिकूल असली, तरी जागतिक पातळीवर उत्साहाचे वातावरण होते. चीनमधील नववर्षाची आठवड्याची सुटी संपल्यामुळे खरेदीदार परतले आहेत. याचा परिणाम होऊन सोन्याची घसरण मर्यादित राहिली. अन्यथा सोने आणखी घसरले असते. भारतीय बाजारांतील सोन्याचा भाव ठरविणाऱ्या सिंगापूर येथील बाजारात सोने 0.७ टक्क्यांनी वाढून १,२१३.२३ डॉलर प्रति औंस झाले. राजधानी दिल्लीत ९९.९ टक्के शुद्धता आणि ९९.५ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव २0 रुपयांनी घसरून अनुक्रमे २७,0५0 रुपये आणि २६,८५0 रुपये तोळा झाला. काल सोन्याचा भाव १00 रुपयांनी वाढला होता. सोन्याच्या आठ ग्रॅमच्या गिन्नीचा भाव आदल्या दिवशीच्या पातळीवर २३,६५0 रुपये असा कायम राहिला.तयार चांदीचा भाव ३७,३00 रुपये किलो असा आदल्या दिवशीच्या पातळीवर कायम राहिला. साप्ताहिक डिलिव्हरीच्या चांदीचा भाव १२0 रुपयांनी वाढून ३६,८00 रुपये किलो झाला. चांदीच्या शिक्क्यांचा भावही आदल्या दिवशीच्या पातळीवर खरेदीसाठी ५९,000 रुपये शेकडा आणि विक्रीसाठी ६0,000 रुपये शेकडा असा कायम राहिला.
सराफा बाजारात पुन्हा मरगळ
By admin | Updated: February 27, 2015 00:13 IST