Join us
Daily Top 2Weekly Top 5

मोठ्या पडझडीनंतर सेन्सेक्स सावरला

By admin | Updated: April 6, 2016 23:00 IST

रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढाव्याच्या दिवशी मोठी घसरण सोसणारा शेअर बाजार बुधवारी काही प्रमाणात सावरला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १७ अंकांनी वाढून २४,९00.६३ अंकांवर बंद झाला.

मुंबई : रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढाव्याच्या दिवशी मोठी घसरण सोसणारा शेअर बाजार बुधवारी काही प्रमाणात सावरला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १७ अंकांनी वाढून २४,९00.६३ अंकांवर बंद झाला. बड्या कंपन्यांत मौल्यवान खरेदी झाल्यामुळे बाजार वाढला.सकाळी बाजार सकारात्मक पातळीवर उघडले होते. त्यानंतर ते दिवसभर अस्थिर असल्याचे दिसून आले. व्यापक बाजारातही वाढीचा कल दिसून आला. स्मॉलकॅप 0.९१ टक्क्यांनी, तर मीडकॅप 0.६0 टक्क्यांनी वाढला. खाजगी क्षेत्रातील वस्तू उत्पादनात मार्चमध्ये ३७ महिन्यांचा उच्चांक झाला आहे. त्याचा सुयोग्य परिणाम बाजारावर झाल्याचे दिसून आले. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ११.१५ अंकांनी अथवा 0.१५ टक्क्यांनी वाढून ७,६१४.३५ अंकांवर बंद झाला.