Join us
Daily Top 2Weekly Top 5

सेन्सेक्स रेकॉर्ड उच्चांकावर

By admin | Updated: April 6, 2017 00:26 IST

रिलायन्स इंडस्ट्री यांच्या दमदार कामगिरीमुळे सेन्सेक्स ६४.०२ अंकांच्या वाढीसह २९,९७४.२४ अंकांच्या रेकॉर्ड उंचीवर बंद झाला.

मुंबई : शेअर बाजारातील तेजी कायम असून बुधवारी मारु ती, रिलायन्स इंडस्ट्री यांच्या दमदार कामगिरीमुळे सेन्सेक्स ६४.०२ अंकांच्या वाढीसह २९,९७४.२४ अंकांच्या रेकॉर्ड उंचीवर बंद झाला. सेन्सेक्स आज ३०,००७.४८ पर्यंत गेला होता. पण, नंतर त्यात घसरण झाली आणि सेन्सेक्स २९,८१७.६९ पर्यंत खाली गेला. अखेर तो ६४ अंकांनी वाढून २९,९७४.२४ अंकांवर बंद झाला. सेन्सेक्स एप्रिलमधील रेकॉर्ड स्तर २९,९१० अंकांच्या पुढे गेला आहे. एनएसई निफ्टी ९,२६५.१५ अंकांच्या नव्या रेकॉर्ड स्तरावर पोहोचला असून, एप्रिलमधील रेकॉर्ड ९,२३७.८५ अंकाच्या पुढे गेला आहे.