Join us

सेन्सेक्स पुन्हा तेजीत

By admin | Updated: August 26, 2015 03:21 IST

आदल्या दिवशीच्या विक्रमी घसरणीनंतर मंगळवारी भारतीय शेअर बाजारांनी तेजीची नोंद केली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २९0.८२ अंकांनी वाढून २६,0३२.३८ अंकांवर बंद झाला.

मुंबई : आदल्या दिवशीच्या विक्रमी घसरणीनंतर मंगळवारी भारतीय शेअर बाजारांनी तेजीची नोंद केली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २९0.८२ अंकांनी वाढून २६,0३२.३८ अंकांवर बंद झाला. जमीनजुमला, धातू आणि बँकिंग क्षेत्राच्या समभागांत मोठी खरेदी झाल्याने सेन्सेक्सला बळ मिळाले. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ७१.७0 अंकांनी वाढून ७,८८0.७0 अंकांवर बंद झाला.जीएसटी विधेयकासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याचा सरकारने घेतलेला निर्णय आणि रुपयाची वाढलेली किंमत ही त्यातील प्रमुख कारणे आहेत. बीएसई सेन्सेक्स सकाळी सकारात्मक पातळीवर तेजीसह उघडला. नंतर तो २६,१२४.८३ अंकापर्यंत वर चढला. तथापि, अचानक विक्रीचा जोर वाढल्याने तो पुन्हा २५,२९८.४२ अंकांपर्यंत खाली घसरला. सत्राच्या मध्यकाळात त्याने पुन्हा एकदा उसळी घेतली. सत्राच्या अखेरीस २९0.८२ अंकांची अथवा १.१३ टक्क्यांची वाढ नोंदवून तो २६,0३२.३८ अंकांवर बंद झाला. या आधीच्या तीन सत्रांत सेन्सेक्स २,१९0.0८ अंकांनी घसरला होता. काल एकाच दिवसात त्याने १,६२४.५१ अंक गमावले होते. राष्ट्रीय शेअर बाजाराचा व्यापक आधारावरील एनएसई निफ्टी ७१.७0 अंकांनी अथवा 0.९२ टक्क्यांनी वाढून ७,८८0.७0 अंकांवर बंद झाला. तत्पूर्वी, दिवसभर तो खालीवर होत होता. एका क्षणी तो ७,९00 अंकांपर्यंत वर चढला होता.