मुंबई : सेवा क्षेत्रात नरमाईचे वृत्त आल्यामुळे शुक्रवारी शेअर बाजार मरगळला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हे दोन्ही निर्देशांक सपाट पातळीवर बंद झाले. खरे म्हणजे सेन्सेक्स सकाळी तेजीसह उघडला होता. नंतर त्यात खूप चढ-उतार झाले. तथापि, सत्राच्या अखेरीस तो 0.११ अंकाच्या घसरणीसह २६,८४३.0३ अंकांवर बंद झाला. असे असले तरी सेन्सेक्स २८ आॅक्टोबर रोजी नंतरच्या सर्वोच्च पातळीवर आहे. दोन सत्रांत सेन्सेक्स १७५.१८ अंकांनी वाढला. एनएसई निफ्टी १.८५ अंक अथवा 0.0२ टक्क्याच्या वाढीसह ८,२२0.८0 अंकांवर बंद झाला. शुक्रवारी संपलेल्या आठवड्यात बीएसई सेन्सेक्स १८९.४३ अंकांनी अथवा 0.७१ टक्क्याने वाढला.
सेन्सेक्स, निफ्टी ‘जैसे थे’ स्थितीत
By admin | Updated: June 4, 2016 02:45 IST