Join us
Daily Top 2Weekly Top 5

सेन्सेक्स, निफ्टीचा एक महिन्याचा उच्चांक

By admin | Updated: April 13, 2015 23:37 IST

सोमवारी शेअर बाजारांनी पुन्हा एकदा तेजी साजरी केली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २९ हजार अंकांच्या वर गेला. १६५.0६ अंकांची वाढ मिळविताना सेन्सेक्स २९,0४४.४४ अंकावर बंद झाला.

मुंबई : सोमवारी शेअर बाजारांनी पुन्हा एकदा तेजी साजरी केली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २९ हजार अंकांच्या वर गेला. १६५.0६ अंकांची वाढ मिळविताना सेन्सेक्स २९,0४४.४४ अंकावर बंद झाला. ही त्याची एक महिन्याची सर्वोच्च पातळी आहे. निफ्टीने सलग सातव्या सत्रात वाढ नोंदविताना ८,८00 अंकांचा टप्पा पार केला.देशाचे औद्योगिक उत्पादन फेब्रुवारीत ५ टक्क्यांनी वाढून ९ महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर गेले आहे. खाण आणि वस्तू उत्पादनातील वाढीने औद्योगिक उत्पादनास तेजी प्राप्त झाली. त्याचा सुयोग्य परिणाम शेअर बाजारावर दिसून आला. सायंकाळी महागाईविषयक आकडे जाहीर होणार होते, त्यामुळे बाजारात थोडी सतर्कताही दिसून आली. त्यामुळे दिवसभर बाजार खाली-वर होताना दिसून आला. ३0 कंपन्यांच्या समभागांचा समावेश असलेला सेन्सेक्स सकाळी तेजीने उघडला होता. नंतर मात्र तो घसरला. त्यानंतर तो पुन्हा वर चढला. एका क्षणी तो २९,0७२.५१ अंकांपर्यंत वर चढला होता. सत्र अखेरीस १६५.0६ अंकांची अथवा 0.५७ टक्क्यांची वाढ नोंदवून सेन्सेक्स २९,0४४.४४ अंकांवर बंद झाला. ५0 कंपन्यांच्या समभागांचा समावेश असलेला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ५३.६५ अंक अथवा 0.६१ टक्क्यांची वाढ नोंदवून ८,८३४.00 अंकांवर बंद झाला. दिवसभर तो ८,८४१.६५ आणि ८,७६२.१0 अंकांच्या मध्ये वर-खाली होताना दिसून आला. दोन्ही निर्देशांकांनी ५ मार्च नंतरची सर्वोच्च पातळी गाठली आहे. ३0 कंपन्यांचा समावेश असलेल्या सेन्सेक्सला भारती एअरटेल, भेल, सन फार्मा, आरआयएल या कंपन्यांच्या समभागांनी तारले. ३0 पैकी १६ कंपन्यांचे समभाग वर चढले. १४ कंपन्यांचे समभाग घसरले. स्मॉलकॅप आणि मीडकॅप निर्देशांक अनुक्रमे 0.८१ टक्के आणि 0.३१ टक्क्यांनी वाढले. त्यामुळे बाजाराला तेजीचा व्यापक आधार मिळाला. तत्पूर्वी शुक्रवारी विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी ३६२.७९ कोटी रुपयांची समभाग खरेदी केली. त्याच वेळी देशांतर्गत गुंतवणूकदार संस्थांनी १३५.१८ कोटी रुपयांची समभाग खरेदी केली. शेअर बाजारात सादर करण्यात आलेल्या हंगामी आकडेवारीवरून हे दिसून आले.जागतिक पातळीवर आशियाई बाजारात संमिश्र कल दिसून आला. युरोपीय बाजारात सकाळच्या सत्रात बदलते कल दिसून आले. ४मंगळवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सार्वजनिक सुटी आहे. त्यामुळे शेअर बाजार बंद राहतील.