Join us  

सेन्सेक्स, निफ्टी सलग सातव्या सत्रात घसरले

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2019 12:59 AM

विक्रीचा जबरदस्त मारा झाल्यामुळे शुक्रवारी शेअर बाजारात सलग सातव्या सत्रात घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ६७.२७ अंकांनी घसरून ३५,८0८.९५ अंकांवर बंद झाला.

मुंबई : विक्रीचा जबरदस्त मारा झाल्यामुळे शुक्रवारी शेअर बाजारात सलग सातव्या सत्रात घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ६७.२७ अंकांनी घसरून ३५,८0८.९५ अंकांवर बंद झाला. या सात सत्रांत सेन्सेक्स १,१६५ अंकांनी घसरला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी २१.६५ अंकांनी घसरून १0,७२४.४0 अंकांवर बंद झाला. सन फार्मा, वेदांता, हीरो मोटोकॉर्प, एसबीआय, मारुती आणि टीसीएस यांचे समभाग घसरले. दरम्यान, या आठवड्यात सेन्सेक्स ७३७.५३ अंकांनी, तर निफ्टी २१९.२0 अंकांनी घसरला.

टॅग्स :निर्देशांक