Join us

सहा सत्रांच्या तेजीनंतर सेन्सेक्स, निफ्टी घसरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 01:38 IST

सलग सहा सत्रांच्या तेजीनंतर मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ५३.०३ अंकांनी घसरून ३३,२१३.१३ अंकांवर बंद झाला. गेल्या सहा सत्रांत सेन्सेक्स ८७६.१९ अंकांनी वाढला होता.

मुंबई : सलग सहा सत्रांच्या तेजीनंतर मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ५३.०३ अंकांनी घसरून ३३,२१३.१३ अंकांवर बंद झाला. गेल्या सहा सत्रांत सेन्सेक्स ८७६.१९ अंकांनी वाढला होता. राष्टÑीय शेअर बाजाराचा निफ्टी २८.३५ अंकांनी घसरून १०,३३५.३० अंकांवर बंद झाला. ३० कंपन्यांच्या सेन्सेक्समध्ये इन्फोसिसचे समभाग सर्वाधिक २.४३ टक्क्यांनी घसरले. डॉ. रेड्डीज, एम अँड एम, टाटा स्टील, एसबीआय, टाटा मोटर्स, एल अँड टी यांचे समभागही घसरले. वाढ मिळविणाºया कंपन्यांत अ‍ॅक्सिस बँक सर्वोच्चस्थानी राहिली. ओएनजीसी, भारती एअरटेल, हीरो मोटोकॉर्प, विप्रो आणि आयटीसी यांचे समभागही वाढले.

सोने, चांदी वाढलेनवी दिल्ली : अमेरिकी फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर वाढीचा निर्णय लांबणीवर टाकला जाण्याची शक्यता वाढल्यामुळे राजधानी दिल्लीतील सराफा बाजारात सोने १०५ रुपयांनी वाढून ३०,३८० रुपये प्रति १० ग्रॅम झाले. चांदीही २५० रुपयांनी वाढून ४०,२५० रुपये किलो झाली. फेडरल रिझर्व्हची दोनदिवसीय बैठक मंगळवारी सुरू झाली. महागाईचा दर वाढल्यामुळे फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर वाढीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे सोन्याची मागणी वाढली.

टॅग्स :निर्देशांक