Join us

सेन्सेक्स, निफ्टी घसरले

By admin | Updated: April 28, 2017 01:33 IST

तीन दिवसांच्या तेजीनंतर गुरुवारी मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स तसेच राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हे दोन्ही निर्देशांक घसरले.

मुंबई : तीन दिवसांच्या तेजीनंतर गुरुवारी मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स तसेच राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हे दोन्ही निर्देशांक घसरले. नफा वसुलीचा फटका बाजारांना बसल्याचे सूत्रांनी सांगितले.३0 कंपन्यांचा समावेश असलेला मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १0३.६१ अंकांनी अथवा 0.३४ टक्क्यांनी घसरून ३0,0२९,७४ अंकांवर बंद झाला. ५0 कंपन्यांचा समावेश असलेला निफ्टी ९.७0 अंकांनी अथवा 0.१0 टक्क्यांनी घसरून ९,३४२.१५ अंकांवर बंद झाला. काल दोन्ही निर्देशांक नव्या उच्चांकावर बंद झाले होते. सेन्सेक्स इतिहासात प्रथमच ३0 हजार अंकांच्यावर बंद झाला होता. आजही सकाळी बाजार तेजीत होते.तथापि, नंतर नफा वसुलीचा जोर वाढल्यामुळे बाजार घसरणीला लागला. (वाणिज्य प्रतिनिधी)