Join us

सेन्सेक्स, निफ्टी पुन्हा आपटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 01:12 IST

तेलगू देसम पार्टीने राष्ट्रीय लोकशाही आघाडीला सोडचिठ्ठी दिल्याने मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स शुक्रवारी ५०९.५४ अंकांनी घसरून ३३,१७६ वर बंद झाला. सेन्सेक्सची ही सलग चौथ्या सत्रातील घसरण ठरली. गेल्या तीन सत्रांत सेन्सेक्सने २३२.४० अंक गमावले.

मुंबई : तेलगू देसम पार्टीने राष्ट्रीय लोकशाही आघाडीला सोडचिठ्ठी दिल्याने मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स शुक्रवारी ५०९.५४ अंकांनी घसरून ३३,१७६ वर बंद झाला. सेन्सेक्सची ही सलग चौथ्या सत्रातील घसरण ठरली. गेल्या तीन सत्रांत सेन्सेक्सने २३२.४० अंक गमावले.राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १६५ अंकांनी घसरून १०,१९५.१५ अंकावर बंद झाला. या आठवड्यात सेन्सेक्स १३१.१४ अंकांनी, तर निफ्टी ३१.७० अंकांनी घसरला. निर्देशांकांची ही सलग तिसरी साप्ताहिक घसरण ठरली.