Join us
Daily Top 2Weekly Top 5

सेन्सेक्स, निफ्टी पुन्हा नव्या उच्चांकांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 01:18 IST

कंपन्यांची तिमाही कामगिरी चांगली राहण्याबाबत अपेक्षा वाढल्यामुळे शेअर बाजारात तेजीचे वातावरण निर्माण झाले. ३० कंपन्यांचा सेन्सेक्स ५४.०३ अंकांनी वाढून

मुंबई : कंपन्यांची तिमाही कामगिरी चांगली राहण्याबाबत अपेक्षा वाढल्यामुळे शेअर बाजारात तेजीचे वातावरण निर्माण झाले. ३० कंपन्यांचा सेन्सेक्स ५४.०३ अंकांनी वाढून ३२,०७४.७८ अंकांवर बंद झाला. हा सेन्सेक्सचा सार्वकालिक उच्चांक ठरला आहे. ५० कंपन्यांचा निफ्टी २९.६० अंकांनी वाढून ९,९१५.९५ अंकांवर बंद झाला. निफ्टीचाही हा सार्वकालिक उच्चांक ठरला आहे. विप्रोचे समभाग सर्वाधिक वाढला.