Join us

सेन्सेक्स उच्चांकावर

By admin | Updated: July 12, 2016 00:17 IST

जागतिक पातळीवरील मजबुतीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी भारतीय शेअर बाजार वाढले. सेन्सेक्स ५00 अंकांच्या वाढीसह ११ महिन्यांच्या वर बंद झाला. निफ्टीही ८,४00 अंकांच्या वर गेला.

मुंबई : जागतिक पातळीवरील मजबुतीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी भारतीय शेअर बाजार वाढले. सेन्सेक्स ५00 अंकांच्या वाढीसह ११ महिन्यांच्या वर बंद झाला. निफ्टीही ८,४00 अंकांच्या वर गेला. ३0 कंपन्यांचा समावेश असलेला सेन्सेक्स ४९९.७९ अंकांनी वाढून २७,६२९.६९ अंकांवर बंद झाला. २५ मे नंतरची सेन्सेक्सची ही सर्वांत मोठी तेजी ठरली आहे. त्या दिवशी सेन्सेक्स ५७५.७0 अंकांनी उसळला होता. याशिवाय सेन्सेक्सचा आजचा बंद १९ आॅगस्ट २0१५ नंतरचा सर्वोच्च पातळीवरीर बंद ठरला. त्या दिवशी सेन्सेक्स २७,९३१,६४ अंकांवर बंद झाला होता. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १४४.७0 अंकांनी वाढून ८,४६७.९0 अंकांवर बंद झाला.