Join us

सेन्सेक्स ३६३ अंकांनी वाढला

By admin | Updated: May 18, 2015 23:41 IST

मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने सोमवारी सलग दुसऱ्या सत्रात तेजी नोंदविली. ३६३.३0 अंकांनी वाढलेला सेन्सेक्स २७,६८७.३0 अंकांवर बंद झाला.

मुंबई : मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने सोमवारी सलग दुसऱ्या सत्रात तेजी नोंदविली. ३६३.३0 अंकांनी वाढलेला सेन्सेक्स २७,६८७.३0 अंकांवर बंद झाला. आगामी पतधोरण आढाव्यात रिझर्व्ह बँकेकडून व्याजदर कपातीची शक्यता वाढली आहे, त्याचप्रमाणे वित्तीय तूट जीडीपीच्या ४.0 टक्क्यांवर नियंत्रित असल्याचे आकडे जाहीर झाले आहेत. या पार्श्वभूमीवर बाजार तेजीत आला आहे. सेन्सेक्स सकाळपासून तेजीत असल्याचे दिसून आले. सकाळी तो २७,४१६.९७ अंकांवर उघडला. त्यानंतर तो आणखी वर चढून २७,७२५.९७ अंकांवर गेला. दिवस अखेरीस ३६३.३0 अंकांची अथवा १.३३ टक्क्यांची वाढ नोंदवून सेन्सेक्स २७,६८७.३0 अंकांवर बंद झाला. २३ एप्रिलनंतरचा हा सर्वोत्तम बंद आहे. त्या दिवशी सेन्सेक्स २७,७३५.0२ अंकांवर बंद झाला होता. दोन सत्रांत सेन्सेक्सने ४८१.२४ अंकांची वाढ मिळविली आहे. ५0 कंपन्यांचा समावेश असलेला व्यापक आधारावरील एनएसई निफ्टी १११.३0 अंकांनी अथवा १.३५ टक्क्यांनी वाढून ८,३७३.६५ अंकांवर बंद झाला आहे. आजची तेजी व्यापक होती. बीएसई स्मॉलकॅप आणि मीड अनुक्रमे 0.९७ टक्के आणि 0.९८ टक्के वाढले. आशियाई बाजारांत संमिश्र कल दिसून आला. जपान, दक्षिण कोरिया आणि तैवान येथील बाजार तेजीसह बंद झाले. चीन, हाँगकाँग आणि सिंगापूर येथील बाजार घसरले. युरोपीय बाजारांत सकाळच्या सत्रात तेजी दिसून आली. फ्रान्स, जर्मनी आणि ब्रिटन येथील बाजार 0.१८ टक्के ते 0.३६ टक्के तेजीत होते. ४सेन्सेक्समधील ३0 कंपन्यांपैकी २७ कंपन्यांच्या समभागांना तेजीचा लाभ मिळाला. डॉ. रेड्डीज, गेल, टाटा पॉवर, एचडीएफसी, एचडीएफसी बँक, आरआरएल, आयटीसी, बजाज आॅटो, इन्फोसिस, भेल, भारती एअरटेल आणि हिंदाल्को यांचे समभाग वाढले. ४बाजाराची एकूण व्याप्ती सकारात्मक राहिली. १,६७५ कंपन्यांचे समभाग वाढले. १,0४६ कंपन्यांचे समभाग घसरले. १२३ कंपन्यांचे समभाग स्थिर राहिले.