Join us

सेन्सेक्स १0४ अंकांनी वाढला

By admin | Updated: July 30, 2015 03:29 IST

चार दिवसांच्या घसरणीला ब्रेक लावताना मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १0४ अंकांनी वाढून २७,५00 अंकांवर बंद झाला. जुलैच्या डेरिव्हेटिव्हज् सौद्यांच्या समाप्तीच्या

मुंबई : चार दिवसांच्या घसरणीला ब्रेक लावताना मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १0४ अंकांनी वाढून २७,५00 अंकांवर बंद झाला. जुलैच्या डेरिव्हेटिव्हज् सौद्यांच्या समाप्तीच्या पार्श्वभूमीवर पार्टीसिपटांकडून झालेल्या मौल्यवान खरेदीच्या बळावर बाजार वाढला.पी-नोटस्संबंधी एका समितीने केलेल्या जाचक शिफारशींमुळे बाजारात घबराट पसरली होती. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सरकार प्रतिकूल निर्णय घेणार नसल्याचे स्पष्टीकरण दिले. त्यानंतर आज बाजारात खरेदीदार परतले. मुंबई शेअर बाजारात खरेदीचा जोर दिसून आला. एका क्षणी सेन्सेक्स २७,६0९.२९ अंकांपर्यंत पोहोचला होता. सत्राच्या अखेरीस तो २७,५६३.४३ अंकांवर बंद झाला. १0४.२0 अंकांची अथवा 0.३८ टक्क्यांची वाढ त्याने नोंदविली. गेल्या चार सत्रात सेन्सेक्सने १,0४५.७0 अंक गमावले आहेत. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ३८.0५ अंकांनी अथवा 0.४६ टक्क्यांनी वाढून ८,३७५.0५ अंकांवर बंद झाला. त्या आधी तो ८,३८१.५0 आणि ८,३३८.४५ अंकांच्या मध्ये हेलकावे खाताना दिसून आला. सेन्सेक्समध्ये समावेश असलेल्या ३0 कंपन्यांपैकी २0 कंपन्यांचे समभाग वाढले. आयटी क्षेत्रातील बडी कंपनी इन्फोसिसचा समभाग सर्वाधिक २.0४ टक्क्यांनी वाढला. मारुती, लुपिन, भेल यांचे समभागही वाढले. टाटा स्टील, हिंदाल्को यांचे समभाग 0.९५ टक्क्यांपर्यंत वर चढले. क्षेत्रनिहाय विचार करता आयटी, वाहन, बँकिंग, औषधी आणि धातू या क्षेत्रातील निर्देशांक वाढले. तेजी व्यापक असल्यामुळे मीडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक 0.८९ टक्क्यांपर्यंत वाढले. (वृत्तसंस्था)