Join us

सेन्सेक्स चार महिन्यांच्या उच्चांकावर

By admin | Updated: February 7, 2017 01:57 IST

रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढाव्यात सकारात्मक निर्णय होण्याच्या अपेक्षेने शेअर बाजारा तेजी आली असून, मुंबई शेअर बाजार चार महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला आहे.

मुंबई : रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढाव्यात सकारात्मक निर्णय होण्याच्या अपेक्षेने शेअर बाजारा तेजी आली असून, मुंबई शेअर बाजार चार महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला आहे. ३0 कंपन्यांचा समावेश असलेला सेन्सेक्स १९८.७६ अंकांनी अथवा 0.७0 टक्क्यांनी वाढून २८,४३९.२८ अंकांवर बंद झाला. २३ सप्टेंबरनंतरचा हा उच्चांक आहे. गेल्या तीन सत्रांत सेन्सेक्स ५८४.५६ अंकांनी वाढला आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ६0.१0 अंकांनी अथवा 0.६९ टक्क्यांनी वाढून ८,८0१.0५ अंकांवर बंद झाला. निफ्टीचाही हा २३ सप्टेंबरनंतरचा उच्चांक ठरला आहे. सन फार्मा, आयसीआयसीआय बँक, अदाणी पोर्ट्स, अ‍ॅक्सिस बँक, हीरो मोटोकॉर्प, आयटीसी, एचयूएल, गेल यांचे समभाग वाढले.