मुंबई : अत्यंत अस्थिर वातावरणात आज शेअर बाजार सलग तिसऱ्या दिवशी घसरले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २४ अंकांनी घसरून २६,८१३.४२ अंकांवर बंद झाला. विदेशी गुंतवणूकदारांकडून सातत्याने होत असलेली विक्री, मान्सूनचा कमजोर अंदाज, रिझर्व्ह बँकेचा आर्थिक सुधारणांबाबत सावध पवित्रा आणि २0 महिन्यांच्या नीचांकावर गेलेला रुपया या कारणांमुळे बाजारांत घसरण झाली आहे.टाटा स्टीलचा समभाग सर्वाधिक २.५८ टक्क्यांनी घसरला. वेदांचा समभाग १.८९ टक्क्यांनी तर हिंदाल्कोचा समभाग 0.६६ टक्क्यांनी घसरला. ३0 कंपन्यांचा समावेश असलेल्या सेन्सेक्समधील १९ कंपन्यांचे समभाग घसरले. ११ कंपन्यांचे समभाग वाढले. या अस्थिर वातावरणातही तेजी दर्शविणाऱ्या कंपन्यांत रिलायन्स इंडस्ट्रीज, विप्रो, एचडीएफसी आणि एचडीएफसी बँक यांचा समावेश आहे. सेन्सेक्स सकाळी तेजीसह २६,९४0.६४ अंकांवर उघडला होता. त्यानंतर तो आणखी वर चढला होता. दोन दिवसांच्या मंदीनंतर सेन्सेक्स चांगले काम करीत असल्याचे पाहून बाजारात उत्साहाचे वातावरण दिसून आले. तथापि, नंतर नफा वसुलीचे सत्र सुरू झाले. त्यामुळे सेन्सेक्स घसरणीला लागला. सत्र अखेरीस २३.७८ अंकांची अथवा 0.0९ टक्क्यांची घसरण नोंदवून तो २६,८१३.४२ अंकांवर बंद झाला. गेल्या तीन सत्रांत मिळून सेन्सेक्सने १,0३५.५७ अंक गमावले आहेत.राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी इंट्रा-डे ट्रेडिंगमध्ये ८,१00 अंकांच्या खाली आला होता. ४.४५ अंकांची अथवा 0.0५ टक्क्यांची घसरण नोंदवून निफ्टी ८,१३0.६५ अंकांवर बंद झाला. (वृत्तसंस्था)४बीएसईचा धातू क्षेत्राचा निर्देशांक सर्वाधिक १.११ टक्क्यांनी घसरला. त्याखालोखाल आरोग्य निर्देशांक 0.७७ टक्क्यांनी, टिकाऊ वस्तू निर्देशांक 0.७५ टक्क्यांनी आणि वाहन क्षेत्राचा निर्देशांक 0.७0 अंकांनी घसरला. बीएसई स्मालकॅप निर्देशांक 0.0४ टक्क्यांनी तर मीडकॅप निर्देशांक 0.१७ टक्क्यांनी घसरला.
सेन्सेक्स तिसऱ्या दिवशीही घसरला
By admin | Updated: June 4, 2015 23:17 IST