Join us

सेन्सेक्स दुस:या दिवशीही कोसळला

By admin | Updated: October 2, 2014 02:12 IST

नफा वसुलीचे सत्र सुरूच राहिल्याने बुधवारी मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 62 अंकांनी कोसळला.

मुंबई : नफा वसुलीचे सत्र सुरूच राहिल्याने बुधवारी मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 62 अंकांनी कोसळला. भारताच्या वस्तू उत्पादन क्षेत्रच्या वाढीचा दर नऊ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर गेल्याने नफा वसुलीला उधान आल्याचे बाजाराशी संबंधित सूत्रंनी सांगितले.
30 कंपन्यांच्या शेअर्सचा समावेश असलेला सेन्सेक्स सत्रदरम्यान मर्यादित वतरुळात राहिला. दिवसअखेरीस 62.52 अंकांच्या घसरणीसह 26,567.99 अंकांवर बंद झाला. कालच्या तुलनेत ही घसरण 0.23 टक्के आहे. 
व्यापक आधार असलेला 50 कंपन्यांच्या शेअर्सवर आधारित नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा निफ्टी 19.25 अंकांनी अथवा 0.24 टक्क्याने घसरून 7,945.55 अंकावर बंद झाला. 
दिल्लीतील एका ब्रोकरने सांगितले की, शेअर बाजार उद्यापासून 5 दिवस बंद राहील. आता तो मंगळवारीच उघडेल. दीर्घ सुटीच्या पाश्र्वभूमीवर वस्तू उत्पादन क्षेत्रत नरमाईचे वृत्त आल्याने गुंतवणूकदारांनी हात आखडता घेऊन नफा वसुलीला महत्त्व दिले. त्यामुळे बाजार धारणा कमजोर झाली. मोठय़ा सुटय़ांच्या आधी गुंतवणूकदार बाजारापासून दूर राहणो पसंत करतात.
एचएसबीसीने केलेल्या सर्वेक्षणानुसार, वस्तू उत्पादन क्षेत्रचा निर्देशांक सप्टेंबरमध्ये 51.0 टक्क्यांवर आला आहे. आदल्या महिन्यात तो 52.4 टक्के होता. डिसेंबर 2013 नंतरची ही नीचांक पातळी ठरली आहे.
डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण झाल्याने इन्फोसिस, टीसीएस आणि विप्रो या कंपन्यांच्या नेतृत्वाखालील आयटी कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली. सेन्सेक्समध्ये समावेश असलेल्या 30 पैकी 20 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली. फक्त 9 कंपन्यांचे शेअर्स वाढ नोंदवू शकले.
 टाटा मोटर्सचा शेअर कालच्याच पातळीवर ‘जैसे थे’ राहिला.
 (प्रतिनिधी)