Join us  

शेअर बाजाराला 'मुहूर्त' फळला; अनेक गुंतवणूकदार झाले कोट्यधीश

By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2018 8:51 PM

मुंबई शेअर बाजारानं आज चांगली झेप घेतली आहे.

मुंबईः मुंबई शेअर बाजारानं आज चांगली झेप घेतली आहे. दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर शेअर बाजारात स्पेशल शेअर ट्रेडिंग केलं गेलं. यावेळी शेअर बाजारानं मोठी उसळी मारली आहे. शेअर बाजार उघडताच सेन्सेक्स 254.77 अंकांनी वधारला, तर निफ्टीतही 68.70 अंकांची वाढ नोंदवली गेली.सेन्सेक्स 254.77 अंकांसह 35,237.68पर्यंत गेला. तर निफ्टीनंही 10,598.40 अंकांपर्यंत मजल मारली. मुहूर्त ट्रेडिंगच्या तासाभरातच गुंतवणूकदार कोट्यधीश झाले. या मुहूर्त ट्रेडिंगच्या निमित्तानं अनेक गुंतवणूकदार 1.18 कोटी रुपये कमावले आहेत. शेअर बाजारात सामान्य ट्रेडिंग 5.30 ते 6.30 वाजेपर्यंत सुरू होते. यादरम्यान अनेकांनी शेअर खरेदी अथवा विक्री केली. तुम्ही जर गुंतवणूकदार असाल तर संध्याकाळी 5.30 ते 6.30 पर्यंत तुम्ही ट्रेडिंग केल्यानं गुंतवणूकदारांसाठी हा दिवस विशेष ठरला आहे. उद्या शेअर बाजार बंद राहणार आहे. 

काय असतं मुहूर्त ट्रेडिंगदिवाळीबरोबरच नव्या वर्षाची सुरुवात होते. या दिवाळीबरोबरच संवत्सर 2075 सुरू होणार आहे. भारतीय परंपरेनुसार देशातील अनेक भागात दिवाळीबरोबरच नव्या वर्षाची सुरुवात होते. या शुभ मुहूर्तावर शेअर बाजारात स्पेशल शेअर ट्रेडिंग केलं जातं. पैसा कमावण्याची सुवर्णसंधीतज्ज्ञ सांगतात, मुहूर्त ट्रेडिंगच्या मुहूर्तावर शेअर बाजारात पैसे गुंतवणं शुभ मानलं जातं. खासकरून श्रीमंत लोक या दिवशी मोठ्या प्रमाणात शेअर बाजारात गुंतवणूक करतात. अशातच ते छोट्या गुंतवणुकीवरही जास्त पैसे कमावतात. मुहूर्त ट्रेडिंगच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजार मोठी उसळी घेतली आहे. मुहूर्त ट्रेडिंगच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूक करणं हे गुंतवणूकदार शुभ मानतात. या दिवशी बरेच जण शेअर्स खरेदी करतात. मुंबई शेअर बाजारात लिस्टेड कंपन्यांची गुंतवणूक 147.10 लाख कोटी रुपयांपर्यंत झाली असून, मंगळवारी तीच गुंतवणूक 140.52 कोटी रुपयांपर्यंत राहिली आहे.  

टॅग्स :शेअर बाजार