मुंबई : मार्चच्या वायदे व्यवहाराची मुदत संपुष्टात येण्यापूर्वी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक (सेन्सेक्स) बुधवारी ५० अंकांनी घसरून दहा आठवड्यांतील सर्वात नीचांकी २८,१११,८३ अंकावर आला. भांडवली वस्तू, वीज व धातू क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर गडगडल्यामुळे बाजाराला फटका बसला. घसरणीचा आज सलग सहावा दिवस होता. सेन्सेक्समधील एल अॅण्ड टी, एसबीआय, टीसीएस, ओएनजीसी, गेल, कोल इंडिया, टाटा स्टील, भेल आणि टाटा पॉवरच्या शेअरची घसरण झाली. दुसरीकडे आयसीआयसीआय बँक, टाटा मोटर्स, सन फार्मा, विप्रो, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, तसेच सेसा स्टरलाईटचे शेअर फायद्यात राहिले. त्यामुळे घसरणीला काही प्रमाणात आळा बसला. किरकोळ गुंतवणूकदारांच्या विक्री व्यवहारांमुळे स्मॉल कॅप आणि मिड कॅपमध्ये घसरणीचे सत्र सुरू राहिले. मुंबई शेअर बाजाराचा ३० शेअरचा सेन्सेक्स चढ्या रीतीने उघडल्यानंतर एक वेळ २८,२४९,६० अंकाच्या उच्चस्तरावर पोहोचला होता. मात्र, त्यानंतर नफा वसुलीमुळे २८,०३१४२ अंकांपर्यंत घसरला होता. अखेरीस सेन्सेक्स ४९.८९ अंक किंवा ०.१८ टक्क्यांच्या नुकसानीसह २८,१११,८३ अंकांवर बंद झाला. ४सेन्सेक्सचा हा १५ जानेवारीनंतरचा सर्वात नीचांक आहे. १५ रोजी सेन्सेक्स २८,०७५,५५ अंकावर बंद झाला होता. ४सेन्सेक्सप्रमाणेच राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही १२.१५ अंक किंवा ०.१४ टक्क्यांच्या नुकसानीसह ८,५३०,८० अंकावर आला. ४निफ्टीचाही १५ जानेवारीनंतरचा हा नीचांक आहे. सहा दिवसांत निफ्टीत १९० अंकांची घसरण झाली आहे.
सहाव्या दिवशीही सेन्सेक्सची घसरण
By admin | Updated: March 25, 2015 23:52 IST