मुंबई : एक दिवसाच्या अल्पशा वाढीनंतर गुरुवारी शेअर बाजारात पुन्हा मोठी पडझड झाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २१५ अंकांनी घसरून २४,७८५.४२ अंकांवर बंद झाला. हा सेन्सेक्सचा तीन आठवड्यांचा नीचांक ठरला. नफावसुलीचा मारा झाल्यामुळे टिकाऊ ग्राहक वस्तू, माहिती तंत्रज्ञान आणि बँकिंग क्षेत्रात मोठी पडझड झाली. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ७,६00 अंकांच्या खाली घसरला आहे.संपलेल्या वित्त वर्षाच्या शेवटच्या तिमाहीतील कंपन्यांच्या कामगिरीचे निकाल येण्याची बाजाराला प्रतीक्षा आहे. त्यातच जागतिक बाजारात संमिश्र कल दिसून आला.
२१५ अंकांनी घसरला सेन्सेक्स
By admin | Updated: April 8, 2016 03:12 IST