Join us  

शेअर बाजारात पुन्हा हाहाकार; सेन्सेक्समध्ये 2015 अंकांची घसरण, निफ्टीही कोसळला 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2020 11:55 AM

एनएसईच्या 50 शेअर्सच्या निफ्टीचा निर्देशांक 432.35 अंक म्हणजेच 4.34 टक्क्यांच्या घसरणीसह 9522.85वर व्यवसाय करत आहे.  

ठळक मुद्देकोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव जगभरात जाणवू लागला आहे. अनेक देशात कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. बाजार उघडताच सेन्सेक्समध्ये 1800 अंकांहून अधिक घट नोंदवली गेली आहे. तर निफ्टीसुद्धा 500 अंकांनी कोसळला आहे.शेअर बाजार उघडताच नोंदवल्या गेलेल्या घसरणीनंतर बीएसईच्या 300 शेअर्सचा निर्देशांक 1550 अंकांहून अधिकनं पडला आहे.

मुंबईः कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव जगभरात जाणवू लागला आहे. अनेक देशात कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्याच पार्श्वभूमीवर जगभरातल्या शेअर बाजारात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. बाजार उघडताच सेन्सेक्समध्ये 1800 अंकांहून अधिक घट नोंदवली गेली आहे. तर निफ्टीसुद्धा 500 अंकांनी कोसळला आहे. काही वेळातच सेन्सेक्स 2015.13 कोसळून 32,088.35वर आला आहे. शेअर बाजार उघडताच नोंदवल्या गेलेल्या घसरणीनंतर बीएसईच्या 30 शेअर्सचा निर्देशांक 1550 अंकांहून अधिकनं पडला आहे. एनएसईच्या 50 शेअर्सच्या निफ्टीचा निर्देशांक 432.35 अंक म्हणजेच 4.34 टक्क्यांच्या घसरणीसह 9522.85वर व्यवसाय करत आहे.  मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक गेल्या आठवड्यापासून दररोज नवनवीन तळ गाठणारा राहिला आहे. बाजाराला धूलिवंदनची सुटी असल्याने सप्ताहात एक दिवस व्यवहार कमीच झाले. शुक्रवारी तर बाजारात मोठी घसरण होऊन लोअर सर्किट लागले. त्यानंतर मात्र निर्देशांकाने उसळी घेतली. बाजारात आलेल्या काही सकारात्मक बातम्यांमुळे बाजार वाढला. त्यामुळेच संवेदनशील निर्देशांक पुन्हा 34 हजारांची, तर निफ्टी 9900 अंशांची पातळी गाठू शकला.मिडकॅप आणि स्मॉलकॅप या क्षेत्रीय निर्देशांकांमध्येही सप्ताहामध्ये अनुक्रमे 11.17 आणि 11.77 टक्के घट झाली आहे. बीएसई 500 या निर्देशांकामधील 500 आस्थापनांपैकी 300हून अधिक आस्थापनांचे दर घसरलेले दिसून आले. या सप्ताहात झालेल्या तीव्र घसरणीमुळे शेअर बाजारातील भांडवली बाजारमूल्य घटल्याने गुंतवणूकदारांचे 15 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. 

Corona Virus: घाबरू नका! मी बरा झालोय; हॉस्पिटलमधून डिस्चार्जनंतर कोरोनाग्रस्ताने सांगितला 'अनुभव'

कधीच सुधरू शकत नाही पाकिस्तान, कोरोनासंदर्भातील सार्क देशांच्या बैठकीत उचलला काश्मीरचा मुद्दा

Coronavirus : 'कोरोनावाला बाबा'ला पोलिसांनी केली अटक; 11 रुपयांत विकत होता कोरोना ठीक करण्याचं तावीज

Corona Virus: मुख्यमंत्र्यांनी 'कोरोना'वरचं औषध सुचवलं; विरोधकांनी सुनावलं!

टॅग्स :निर्देशांक