मुंबई : शुक्रवारी शेअर बाजारात पुन्हा एकदा घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १५७ अंकांनी, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी २८ अंकांनी घसरला. या सप्ताहात मात्र दोन्ही निर्देशांक वाढीसह बंद झाले. सेन्सेक्स २४८.६२ अंकांनी अथवा अथवा 0.८९ टक्क्याने, तर निफ्टी ९७.३0 अंकांनी अथवा १.१३ टक्क्याने वाढला. याशिवाय सलग पाचव्या महिन्यांत दोन्ही निर्देशांक वाढीसह बंद झाले आहेत.३0 कंपन्यांचा समावेश असलेला सेन्सेक्स १५६.७६ अंकांनी घसरून २८,0५१.८६ अंकांवर बंद झाला. ५0 कंपन्यांचा समावेश असलेला निफ्टी २७.८0 अंकांनी घसरून ८,६३८.५0 अंकांवर बंद झाला. (प्रतिनिधी)
१५७ अंकांनी घसरला सेन्सेक्स
By admin | Updated: July 30, 2016 05:17 IST