Join us

सेन्सेक्सने प्रथमच ओलांडला 30 हजारांचा टप्पा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2017 18:41 IST

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक बुधवारी प्रथमच 30 हजारांचा टप्पा ओलांडत 30,133 अंकांवर बंद झाला.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. 26 - मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक बुधवारी प्रथमच 30 हजारांचा टप्पा ओलांडत 30,133 अंकांवर बंद झाला. दिवसभराच्या व्यवहारात निर्देशांकाने 30,167 ही सर्वोच्च पातळी गाठली होती. 
 
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी सुद्धा विक्रमी 9350 अंकांच्या पुढे बंद झाला. 5 एप्रिलला बीएसई सेन्सेक्स पहिल्यांदा 29,974 अंकांवर बंद झाला होता. निफ्टीने आपल्या कालच्याच विक्रमाला मागे टाकले. निफ्टी मंगळवारी 9,306 अंकांवर बंद झाला होता.