Join us

कच्च्या तेलामुळे सेन्सेक्स आपटला

By admin | Updated: May 6, 2017 00:28 IST

कच्च्यात तेलाच्या किमतीत झालेली घसरण आणि त्यामुळे जागतिक बाजारात झालेली घसरण याचा फटका मुंबई शेअर बाजारालाही

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कच्च्यात तेलाच्या किमतीत झालेली घसरण आणि त्यामुळे जागतिक बाजारात झालेली घसरण याचा फटका मुंबई शेअर बाजारालाही बसला. ३० हजारी मनसबदार बनेलला मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स शुक्रवारी आठवड्याच्या अखेरच्या दिवशी २६७ अकांनी आपला. २२ मार्चनंतरची सेन्सेक्समधील ही सर्वात मोठी घसरण आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीनेही गटांगळी खात उच्चांकावरून आपटी खाल्ली. सेन्सेक्स गुुरुवारी २३१ अंकांनी वधारून ३० हजारांवर पोहोचला होता. बँकिंग आणि पायाभूत क्षेत्रातील महत्त्वपूर्ण निर्णयानंतर सेन्सेक्समध्ये तेजी आली होती. शुक्रवारी २६७ अंकांची घसरण झाली आणि सेन्सेक्स २९,८५८.८० वर बंद झाला. निफ्टीने आपला जुना रेकॉर्ड मोडत ९३६७ अंकांच्या पुढे ९३७७ अंकांपर्यंत मजल मारल्यानंतर आज यात घसरण झाली. निफ्टी ७४.६० अंक घसरुन ९२८५.३० वर बंद झाला. याबाबत बाजारातील तज्ज्ञ आनंद जेम्स म्हणाले की, कच्च्या तेलातील दरात घसरण झाल्याने बाजारात अस्वस्थता आहे. कच्च्या तेलातील दरात घसरणीमुळे ओएनजीसी आणि आॅइल इंडिया यांच्या शेअर्समध्ये क्रमश: २.८३ टक्के आणि २.९८ टक्के घसरण झाली आहे. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकही घसरले. आशिया बाजारांमध्ये चीन, हाँगकाँग आणि तैवान येथील बाजारातही घसरण दिसून येत आहेत. सुरुवातीला युरोपीय बाजारांमध्येही घसरण दिसून आली. सेन्सेक्सच्या ३० कंपन्यांपैकी टाटा मोटर्सला सर्वाधिक फटका बसला. टाटा मोटर्सचे शेअर्स ३.८४ टक्क्यांनी उतरला. अ‍ॅक्सिस बँकेचा शेअर २.७० टक्के, गेलचा २.४९ टक्के तर रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर २.२२ टक्के घसरला. का घसरला बाजार?न्यूयॉर्कमध्ये शुक्रवारी कच्चे तेल पाच महिन्यांच्या नीचांकावर ४३.७६ डॉलर प्रति बॅरलवर होते. त्यामुळे जागतिक बाजारपेठेत घसरण दिसून आली. जागतिक अर्थव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी बँकिंग नियमन कायद्यातील दुरुस्तीला मंजुरी दिली आहे. एनपीएबाबत आता रिझर्व्ह बँकेला आता व्यापक अधिकार मिळाले आहेत, त्याचाही काहिसा चांगला परिणाम बाजारावर झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे यापेक्षा मोठी घसरण थांबली गेली, असे तज्ज्ञांचे मत आहे.