Join us

सेंसेक्सची भरारी, पहिल्यांदाच ओलांडला २८ हजारचा टप्पा

By admin | Updated: November 5, 2014 12:38 IST

सेंसेक्सच्या निर्देशांकाने बुधवारी ऐतिहासिक भरारी घेत पहिल्यांदाच २८ हजारचा टप्पा ओलांडला आहे. तर निफ्टीनेही ८.३६३ अंशांपर्यंत झेप घेतली आहे.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. ५ -  सेंसेक्सच्या निर्देशांकाने बुधवारी ऐतिहासिक भरारी घेत पहिल्यांदाच २८ हजारचा टप्पा ओलांडला आहे. तर निफ्टीनेही ८.३६३ अंशांपर्यंत झेप घेतली आहे. 
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये झालेली घट,  गुंतवणुकीमध्ये झालेली वाढ आणि कंपन्यांचे चांगले तिमाही परिणाम यामुळे शेअर बाजारात सध्या 'अच्छे दिन' आल्याचे दिसत आहे. बुधवारी शेअर बाजार सुरु होताच निर्देशांकाने १४१ अंकाची झेप घेत २८ हजारचा टप्पा ओलांडला. तर निफ्टीमध्येही ३९ अंकांनी वाढ झाली आहे. देशामध्ये केंद्र सरकारतर्फे सुरु असलेल्या आर्थिक सुधारणांमुळे शेअर बाजारात गेल्या काही आठवड्यांपासून तेजी आली आहे. टीसीएस, बजाज ऑटो, टाटा ऑटो, सन फार्मा, सिप्ला या कंपन्यामध्ये गुंतवणूकदारांचा कल जास्त असल्याचे जाणकारांनी सांगितले.