Join us

उच्चांकावरून मुंबई सेन्सेक्स मागे फिरला

By admin | Updated: June 12, 2014 00:22 IST

औद्योगिक उत्पादन व महागाईची ताजी आकडेवारी जाहीर होण्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात नफाखोरी झाली

मुंबई : औद्योगिक उत्पादन व महागाईची ताजी आकडेवारी जाहीर होण्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात नफाखोरी झाली. त्यामुळे सेन्सेक्सने ऐतिहासिक उच्चांक गाठला; पण नंतर मागे परत आला. पाच सत्रांपूर्वी बाजार कोसळला होता. मे महिन्यात व्यापारातील तोटा मे महिन्यात वाढून १० महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला. याव्यतिरिक्त युरोपियन शेअर बाजाराची सुरुवात कमजोरीने झाल्याने बाजारात नकारात्मक परिणाम बघायला मिळाला.३० कंपन्यांचा समावेश असलेला मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स मजबुतीने उघडल्यानंतर उच्चांकावर गेला होता; परंतु दुपारच्या सत्रानंतर नफेखोरी सुरू झाल्याने बाजार १०९.६५ अंकांनी किंवा ०.४३ टक्क्याने कोसळला. या घसरणीसह बाजार २५,४७३.८९ अंकांवर बंद झाला. सेन्सेक्स सत्रादरम्यान २५,३६५.६५ अंकांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला.त्याचप्रमाणे नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा निफ्टी पहिल्यांदाच ७,७००च्या पुढे सरकला होता. बाजारातील नफेखोरीमुळे निफ्टी २९.५५ किंवा ०.३९ टक्क्यांच्या घसरणीसह ७,६२६.६५ अंकावर बंद झाला. मागील चार सत्रात निफ्टी २५४ अंकांनी वधारला होता.वेल्थरेज सेक्युरिटीजचे व्यवस्थापक व सीईओ किरणकुमार कविकोंडाला म्हणाले की, सुरुवातीला ९० मिनिटांपर्यंत फायद्यात असलेला बाजार नंतर कोसळत गेला. नफेखोरीचा सर्वाधिक फटका रियल्टी क्षेत्राला बसला.धातू, ऊर्जा, मीडिया क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर्स गडगडले. दुसरीकडे आयटी व फार्मा क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर्स वधारले. (प्रतिनिधी)शेअर बाजारातील आकडेवारीनुसार परकीय संस्थागत गुंतवणूकदारांनी मंगळवारी ६८२.२६ कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले.आशियाई बाजारात मिळताजुळता कल बघायला मिळाला. चीन, जपान, दक्षिण कोरिया आणि तैवानचे बाजार वधारले. सिंगापूर व हाँगकाँगच्या बाजारात घसरण बघायला मिळाली.