Join us

कर सुधारणा विधेयक लांबण्याच्या शक्यतेने सेन्सेक्स पुन्हा कोसळला

By admin | Updated: December 9, 2015 23:34 IST

कर सुधारणा विधेयक लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे शेअर बाजारांत बुधवारी सलग सहाव्या सत्रात घसरण झाली.

मुंबई : कर सुधारणा विधेयक लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे शेअर बाजारांत बुधवारी सलग सहाव्या सत्रात घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २७४ अंकांनी घसरला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ७,७00 अंकांच्या पातळीच्या खाली आला. वस्तू व सेवाकर विधेयक हिवाळी अधिवेशनात मंजूर होण्याची शक्यता धूसर झाली आहे. सरकार आणि प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसमधील वाढत्या दरीमुळे हे विधेयक अडकण्याची शक्यता आहे. ३0 कंपन्यांचा समावेश असलेला बीएसई सेन्सेक्स २७४.२८ अंकांनी अथवा १.0८ टक्क्याने घसरून २५,0३६.0५ अंकांवर बंद झाला. ७ सप्टेंबरनंतरची ही सर्वात कमजोर पातळी ठरली आहे. सेन्सेक्स दिवसभर अस्थिर होता. गेल्या ६ सत्रांत सेन्सेक्सने १,१३३.३६ अंक गमावले आहेत. व्यापक आधारावरील एनएसई निफ्टी ८९,२0 अंकांनी अथवा १.१६ टक्क्यांनी घसरून ७,६१२.५0 अंकांवर बंद झाला.