Join us  

शेअर बाजार 792 अंकांनी कोसळला, गुंतवणुकदारांचे पाच लाख कोटी बुडाले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2019 4:46 PM

शुक्रवारी सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पानंतर आर्थिक जगतात निराशाजनक वातावरण निर्माण झाले आहे.

मुंबई - शुक्रवारी सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पानंतर आर्थिक जगतात निराशाजनक वातावरण निर्माण झाले आहे. अर्थविश्वातील या निराशेचे पडसाद सोमवारी शेअर बाजारात उमटले असून, दिवसभराच्या व्यवहारांनंतर सेंसेक्समध्ये मोठी घसरण दिसून आली. संपूर्ण दिवसभरात सेंसेक्स 792.82 अंकांनी कोसळून 38 हजार 720.57 अंकांवर बंद झाला. सेंसेक्सबरोबरच नॅशनल स्टॉक्स एक्सेंजच्या निफ्टीमध्येही 252.55 अंकांची घसरण झाली असून, निफ्टी 11 हजार 558.60 अंकांवर बंद झाला.  शेअर बाजारातील या पडझडीमुळे गुंतवणुकदारांचे सुमारे 5 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. वित्तमंत्री निर्मला सीतारमन यांनी शुक्रवारी अर्थसंकल्प मांडल्यानंतर शेअर बाजारात निराशा पसरून सेंसेक्स आणि निफ्टीमध्ये घसरण झाली होती. दरम्यान, आज आठवड्याच्या सुरुवातीलाही अर्थसंकल्पाचे निराशाजनक पडसाद शेअर बाजारात उमटण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. त्याप्रमाणे आज व्यवहारांना सुरुवात झाल्यावर सेंसेक्स आणि निफ्टीची मोठ्या प्रमाणात पडझड झाली. दरम्यान, शेअर बाजारातील पडझडीमुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे.  

टॅग्स :शेअर बाजारनिर्देशांक