मुंबई : शेअर बाजाराने बुधवारी मोठी उसळी घेतली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २५ हजार अंकांच्या वर गेला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही ७,७00 अंकांच्या पुढे गेला. सेन्सेक्स ४३८.१२ अंकांनी वाढून २५,३३८.५८ अंकांवर बंद झाला. १.७६ टक्क्यांची वाढ त्याने नोंदवली. हा सेन्सेक्सचा सुमारे महिनाभराचा उच्चांक ठरला आहे. ६ जानेवारीनंतर सर्वोच्च पातळीवर जावून तो बंद झाला.राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १३८.२0 अंकांनी अथवा १.८२ टक्क्यांनी वाढून ७,७३५.२0 अंकांवर बंद झाला.
सेन्सेक्स २५ हजार अंकांच्या वर
By admin | Updated: March 31, 2016 02:28 IST