मुंबई : शेअर बाजारात आज मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशीही तेजीचा सिलसिला कायम राहिला. टाटा मोटर्सच्या नेतृत्वाखाली आघाडीच्या शेअर्समध्ये मागणीमुळे बीएसईचा सेन्सेक्स ३६१ अंकांनी उसळी घेत दहा आठवड्यांच्या उंचीवर पोहोचला.तीस शेअर्सवाला सेन्सेक्स जोरदार मुसंडीसह उघडला आणि दिवसभराच्या व्यवहारात २५,९०४.९८ अंकावर पोहोचला. शेवटी किरकोळ नफेखोरीने सेन्सेक्समध्ये ३६१.५३ अंकांच्या वाढीसह २५,८८०.७७ अंकांवर बंद झाला.राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही ७,७०० च्या मनोवैज्ञानिक पातळीवर पोहोचला. १०१.१० अंकांच्या बळकटीसह निफ्टी ७,७२७.०५ अंकांवर बंद झाला.ब्रोकर्सनी सांगितले की, जूनच्या आयआयपी आकड्यांपूर्वी आणि कच्च्या तेलाच्या भावातील कमजोर कल यामुळे तेल शुद्धीकरण, बँकिंग, ऊर्जा, टिकाऊ ग्राहकोपयोगी वस्तू उत्पादक कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी नोंदली गेली.टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये ५.९२ टक्क्यांनी वाढ झाली. गेल, एचडीएफसी लिमिटेड, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, एनटीपीसी, ओएनजीसी, रिलायन्स इंडस्ट्रीज, एसबीआय, कोल इंडिया, एल अॅण्ड टी, कोल इंडिया, सन फार्मा, सिप्ला, टाटा स्टील, बजाज आॅटो आणि भेल यांच्या शेअर्समध्येही तेजी दिसून आली.सेन्सेक्समध्ये सहभागी ३० पैकी २६ कंपन्यांना तेजीचा फायदा झाला, तर उर्वरित तीन कंपन्यांचे शेअर घसरणीसह बंद झाले.गेल इंडिया, टाटा मोटर्स, एचडीएफसी, ओएनजीसी, सन फार्मा, अॅक्सिस बँक, टाटा स्टील यांच्या शेअर्समध्ये वाढ नोंदली गेली. तिकडे भारती एअरटेलच्या शेअरमध्ये १.२६ टक्क्यांची घसरण झाली. (प्रतिनिधी)
सेन्सेक्स १० आठवड्यांच्या उच्चांकावर; निफ्टीही तेजीत
By admin | Updated: August 13, 2014 03:55 IST