Join us
Daily Top 2Weekly Top 5

आर्थिक संकटांपासून भारत सुरक्षित-जेटली

By admin | Updated: September 3, 2016 07:06 IST

जगभरातील अनेक देशांमध्ये आज राजकीय आणि आर्थिक उलथापालथ होत आहे. मात्र या संकटांपासून भारत पूर्णपणे सुरक्षित असून देशाला विकासाच्या अनेक संधी उपलब्ध आहेत

मुंबई : जगभरातील अनेक देशांमध्ये आज राजकीय आणि आर्थिक उलथापालथ होत आहे. मात्र या संकटांपासून भारत पूर्णपणे सुरक्षित असून देशाला विकासाच्या अनेक संधी उपलब्ध आहेत, असे मत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केले.समाजाच्या सबलीकरणातील शिक्षणाचे महत्त्व या विषयावर बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘तालीम ओ तर्बियत’ संमेलनात शुक्रवारी जेटली बोलत होते. ते पुढे म्हणाले, जग नेमके कोणत्या दिशेला चालले आहे, हे सांगणे अवघड आहे. जगात हिंसाचार, दहशतवादात वाढ होत आहे. परंतु, विविध जाती-धर्माचे लोक राहत असूनही सुदैवाने भारतात अशी समस्या नाही. देशाची आर्थिक वृद्धी ही इतर देशांच्या तुलनेत अधिक चांगली आहे. (प्रतिनिधी)