Join us
Daily Top 2Weekly Top 5

४० कंपन्यांवर सेबी करणार कारवाई

By admin | Updated: February 29, 2016 02:53 IST

बेकायदेशीर मार्गांनी पैसा गोळा करणाऱ्या योजनांविरुद्ध सेबीने (सिक्युरिटीज अ‍ॅण्ड एक्स्चेंज बोर्ड आॅफ इंडिया) या वर्षी कठोर कारवाई करून आतापर्यंत

नवी दिल्ली : बेकायदेशीर मार्गांनी पैसा गोळा करणाऱ्या योजनांविरुद्ध सेबीने (सिक्युरिटीज अ‍ॅण्ड एक्स्चेंज बोर्ड आॅफ इंडिया) या वर्षी कठोर कारवाई करून आतापर्यंत ४० पेक्षा जास्त कंपन्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. या कंपन्यांनी लोकांकडून जवळपास १,५०० कोटी रुपये गोळा केले आहेत.पैसा गोळा करण्यासाठी या कंपन्यांना आपल्या रोख्यांना सूचिबद्ध करावे लागते. कारण प्रत्येक कंपनीला ५० पेक्षा जास्त लोकांना भाग (शेअर) द्यावे लागतात. त्यांना इतर गोष्टींबरोबरच मसुदाही सादर करावा लागतो; परंतु या कंपन्यांनी यातील काहीच केले नाही, असे सेबीने म्हटले. काही कंपन्यांनी नोंदणी नसलेल्या सामूहिक गुंतवणूक योजनांच्या माध्यमातून पैसे गोळा केले.सेबीकडील माहितीनुसार २०१६ च्या प्रारंभापासून आतापर्यंत ४३ कंपन्यांविरोधात कारवाई करण्यात आली आहे. या कंपन्यांनी ५.२ लाखांपेक्षा जास्त गुंतवणूकदारांकडून १,४७९ कोटी रुपये गोळा केले.