Join us

फोर्टिसचे ४०० कोटी परत करण्याचे सेबीचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 06:30 IST

मुंबई : भारतातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी रुग्णालय शृंखला कंपनी ‘फोर्टिस हेल्थकेअर लि.’ला कंपनीचेच एकेकाळचे मालक मलविंदर सिंग व शिविंदर ...

मुंबई : भारतातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी रुग्णालय शृंखला कंपनी ‘फोर्टिस हेल्थकेअर लि.’ला कंपनीचेच एकेकाळचे मालक मलविंदर सिंग व शिविंदर सिंग या बंधुंनी ४०० कोटींना (५४.३ दशलक्ष डॉलर) फसविल्याचे बाजार नियामक सेबीने म्हटले. तीन महिन्यांत ही रक्कम कंपनीला परत करण्याचे आदेशही सेबीने त्यांना दिले आहे.मलविंदर व शिविंदर हे दोघे कंपनीचे संस्थापक व बहुतांश हिस्सेदारी धारक होते. कंपनीतील घोटाळ्यांची माहिती समोर येताच सेबीने त्यांचा तपास सुरू केला. सिंग बंधूंचे एकेकाळी भारतात असलेले औद्योगिक साम्राज्य आता लयाला गेले आहे. त्यांना कर्ज देणाºया संस्थांनी फोर्टिसमधील हिस्सेदारी या वर्षाच्या सुरुवातीलाच जप्त केली. ही कंपनी अधिग्रहित करण्याची तयारी मलेशियाच्या आयएचएच हेल्थकेअरने चालविली आहे. एका घोटाळ्याप्रकरणी जपानच्या दाईची सान्क्यो कंपनीने यांच्यावर खटला भरला होता.