Join us
Daily Top 2Weekly Top 5

३४ कंपन्यांना सेबीने ठोठावला ५0 लाख दंड

By admin | Updated: October 11, 2015 22:21 IST

गुंतवणूकदारांच्या तक्रारींचा निपटारा न करणाऱ्या ३४ कंपन्यांना सेबीने सुमारे ५0 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

नवी दिल्ली : गुंतवणूकदारांच्या तक्रारींचा निपटारा न करणाऱ्या ३४ कंपन्यांना सेबीने सुमारे ५0 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. २0१५-१६ या आर्थिक वर्षात एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत सेबीने या कंपन्यांना ४९.५0 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. २५ हजारांपासून ते १५ लाखांपर्यंत दंडाचा त्यात समावेश आहे. यंदा सर्वाधिक १५ लाखांचा दंड थापर एक्स्पोर्टस् आणि थापर इस्पातवर लावण्यात आला आहे. सेबीने कंपन्यांना तक्रार निवारणासाठी आॅनलाईन निपटाराप्रणाली ‘स्कोर्स’ची नोंदणी करण्याचे बंधन घातले होते. त्यात या कंपन्या अपयशी ठरल्या. तसेच गुतंवणूकदारांच्या तक्रारींचा निपटाराही त्या करू शकल्या नाहीत. या कंपन्यांवर सेबीने आता कारवाईचा बडगा उगारला आहे. गेल्यावर्षी याच अवधीत सेबीने ४0 कंपन्यांना ६६ लाखांचा दंड ठोठावला होता. याशिवाय सेबीने आणखी २0 कंपन्यांना तसेच त्यांच्या संचालकांना शेअर बाजारात व्यवसाय करण्यास बंदी घातली आहे.