Join us

तीन कंपन्यांवर सेबीची मनाई

By admin | Updated: June 24, 2015 23:48 IST

रोखे जारी करून निधी उभारण्यास सेबीने तीन कंपन्यांना मनाई केली आहे. मातृभूमी प्रोजेक्टस्, जुगांतर रियल्ट आणि वारीस फायनान्स अ‍ॅण्ड इन्व्हेस्टमेंट

नवी दिल्ली : रोखे जारी करून निधी उभारण्यास सेबीने तीन कंपन्यांना मनाई केली आहे. मातृभूमी प्रोजेक्टस्, जुगांतर रियल्ट आणि वारीस फायनान्स अ‍ॅण्ड इन्व्हेस्टमेंट या तीन कंपन्या आणि या कंपन्यांच्या संचालकांना सार्वजनिक रोखेसंदर्भातील नियमाचे उल्लंघन केल्याने सेबीने निधी उभारण्यास मनाई केली आहे. एनसीडीच्या (अपरिर्वतनीय ऋणपत्र) मोबदल्यात रक्कम दिली जात नाही, अशी गुंतवणूकदारांची तक्रार होती. मातृभूमी प्रोजेक्टस्ने २०१२-१३ मध्ये अपरिवर्तनीय ऋणपत्रामार्फत ४ कोटी जमा केले होते.