Join us

रोजगाराचा शोध घ्या आता पोर्टलवरही

By admin | Updated: June 16, 2015 02:54 IST

सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगात (एमएसएमई) रोजगार शोधणाऱ्यांच्या सोयीसाठी सोमवारी पोर्टल सुरू करण्यात आले आहे.

नवी दिल्ली : सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगात (एमएसएमई) रोजगार शोधणाऱ्यांच्या सोयीसाठी सोमवारी पोर्टल सुरू करण्यात आले आहे. पोर्टल ‘डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू डॉट ईईएक्स डॉट डीसीएमएसएमई डॉट गव्ह डॉट इन’ उद्योगांना कुशल व कार्यक्षम मनुष्यबळ शोधण्यास मदत करील.पोर्टलचे उद््घाटन करताना सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री कलराज मिश्र म्हणाले की, ‘पोर्टलमुळे कुशल कामगारांना व्यासपीठ निर्माण झाले आहे व त्यावर ते रोजगाराचा शोध घेऊ शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडिया, मेक इन इंडिया, स्कील इंडियासारख्या प्रमुख कार्यक्रमांना अनुरूप असे रोजगार विनिमय पोर्टल तयार केले आहे. या पोर्टलवर नोकऱ्या मागणाऱ्यांना कारखाने आणि कारख्यान्यांना कुशल मनुष्यबळ उपलब्ध होईल.’ पोर्टलमुळे कुशल मनुष्यबळाच्या शोधात लागणारा वेळ वाचेल.