ट्रम्प यांचा विजय आणि हजार-पाचशेच्या नोटावरील बंदी यामुळे बुधवारी सराफा बाजारात ग्राहकांच्या उड्या पडल्या अन् सोने ३ वर्षांच्या उच्चांकावर गेले. राजधानी दिल्लीत सोन्याचा भाव तब्बल ९00 रुपयांनी वाढून ३१,७५0 रुपये प्रति १0 ग्रॅम झाला. चांदीही १,१५0 रुपयांनी वाढून ४५ हजार रुपये किलो झाली. नोटांवरील बंदीमुळे सकाळच्या काळात तर सोन्याचा भाव ३४ हजारांपर्यंत गेल्याचे दिसून आले. म्हणून मागणी : ट्रम्प यांच्या विजयामुळे जगभरातील शेअर बाजारात भूकंप आला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी शेअर बाजारांकडून सोन्याकडे पैसा वळविला आहे. गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय, हा विचार त्यामागे आहे. अमेरिकी निवडणुकीचे कल जसजसे येऊ लागले तसतसे सोने वाढताना दिसून आले.दिल्लीत ९९.९ टक्के आणि ९९.५ टक्के शुद्धतेच्या सोन्याचा भाव प्रत्येकी ९00 रुपयांनी वाढून अनुक्रमे 31,750रुपये आणि ३१,६00 रुपये प्रति १0 ग्रॅम झाला. १९ नोव्हेंबर २0१३ नंतरचा हा उच्चांकी भाव ठरला आहे. दिल्लीत तयार चांदीचा भाव १,१५0 रुपयांनी वाढून ४५ हजार रुपये किलो झाला. चांदीच्या शिक्क्यांचा भाव १ हजारांनी वाढून खरेदीसाठी ७७ हजार रुपये आणि विक्रीसाठी ७८ हजार रुपये प्रति शेकडा झाला.सिंगापूर येथील बाजारात सोने ४.८ टक्क्यांनी वाढून १,३३७.३८ डॉलर प्रति औंस झाली. गेल्या जूननंतरची ही सर्वांत मोठी वाढ ठरली. हजार-पाचशेच्या नोटा बंद झाल्यामुळे ज्यांच्याकडे रोख रक्कम आहे, ते सुरक्षित पर्याय म्हणून सोने खरेदी करीत आहेत. दुसरीकडे ट्रम्प यांच्या विजयामुळे डॉलरच्या तुलनेत रुपया कमजोर झाला आहे. त्यामुळे सोने आयात आणखी महागणार आहे.खान्देशात सराफा बाजाराला सर्वाधिक फटकाचंद्रकांत जाधव ल्ल जळगाव५०० व १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्याच्या निर्णयाचा प्रतिकूल परिणाम जळगावच्या सराफा बाजारावर दिसून आला. सोने व्यावसायिक ५०० व १००० रुपयांच्या नोटा घेत नव्हते, तर ग्राहकांकडे देण्यासाठी १००, ५० रुपयांच्या पुरेशा नोटा नव्हत्या. परिणामी, व्यवहार ठप्प झाले. बाजाराला सुमारे १०० कोटींचा फटका बसला.दुकानांवर नोटांबाबत फलकसोन्याच्या दुकानांवर ५०० व १००० रुपयांच्या नोटा स्वीकारल्या जाणार नाहीत, असे फलक लावण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांनी आज बँक व्यवस्थापकांची बैठक घेतली.
सोने खरेदीसाठी झुंबड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2016 04:56 IST