Join us

शाळा महाविद्यालय

By admin | Updated: February 6, 2015 22:35 IST

तिरपुडे कॉलेज ऑफ सोशल वर्क

तिरपुडे कॉलेज ऑफ सोशल वर्क
नागपूर : तिरपुडे समाजकार्य महाविद्यालयात कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर स्व. नाशिकराव उपाख्य बाळासाहेब तिरपुडे यांच्या ९५ व्या जयंतीनिमित्त जिल्हा विधीसेवा प्राधीकरण व नवजीवन सोसायटी तसेच महिला विकास केंद्राच्यावतीने करण्यात आले. कार्यक्रमाला वरिष्ठ सिव्हिल न्या. किशोर जयस्वाल, ॲड. प्रदीप अग्रवाल आणि सिस्टर फिलोमिना उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून न्या. जयस्वाल म्हणाले, कायदेविषयक सल्ला प्रत्येक नागरिकाला मिळालाच पाहिजे. कारण कायदे माणसांसाठी तयार करण्यात आले आहेत. त्याचा लाभ आपल्याला झाला पाहिजे. मोफत कायदेशीर सल्ला लोकांना मिळाला तर लोकांमध्ये जागरूकता निर्माण होईल. याप्रसंगी त्यांनी अनेक गंभीर विषयांवर मार्गदर्शन केले. ७२ हजारापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला कायदेविषयक सल्लागार मिळतो, असे त्यांनी सांगितले. ॲड. प्रदीप अग्रवाल म्हणाले, माहितीच्या अधिकाराबाबत समाजकार्याच्या विद्यार्थ्यांनी माहितीचा अधिकार आणि त्याचे लाभ सर्वांना मिळावे, यासाठी प्रयत्न करण्याची गरज सांगितली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. केशव पाटील यांनी, संचालन दीपक मसराम तर आभार अरुणा गजभिये यांनी मानले. कार्यक्रमाला समाजकार्याचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
------
एम. जे. महाविद्यालय
नागपूर : महालक्ष्मी जगदंबा महाविद्यालय, भगिनी मंडळ, झाशी राणी चौक येथील बीएफए, बीएफडी आणि डीडीएमच्या विद्यार्थ्यांनी ॲडस्पेक प्रदर्शनाचे आयोजन अनुसयाबाई काळे सभागृह, उत्तर अंबाझरी मार्ग येथे केले. या प्रदर्शनाचे उद्घाटन मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून प्रफुल्ल क्षीरसागर, पांडे, किशोर ठुठेजा, सुनीता वाधवान, संचालक उदय टेकाडे, अनिता टेकाडे, वृषाली जंजाळ उपस्थित होते. याप्रसंगी बावनकुळे म्हणाले, या विद्यार्थ्यांना राज्य आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर जाण्यासाठी शासनातर्फे सहकार्य करण्यात येईल. याप्रसंगी त्यांनी चित्र आणि फॅशन डिझाईनच्या विद्यार्थ्यांची प्रशंसा करीत त्यांच्या कलाकृतीबाबत समाधान व्यक्त केले. या अभ्यासक्रमाचे महत्त्व सध्या सातत्याने वाढते आहे. जोपर्यंत माणूस आहे तोपर्यंत या कलेची गरज भासणार आहे. महिलांनी ही कला शिकून स्वत:च्या पायावर उभे व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन सुमेधा नगरकर यांनी आभार अंजली शाहू यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुमित धांडोळे, रेणु सोमलवार, मेघना पोलकट, दीप्ती भागवत, विनिता राजभोग, पौर्णिमा ठाकरे, रंजना पराते, प्रियंका परिहार, कांचन दुर्वे यांनी परिश्रम घेतले.