Join us
Daily Top 2Weekly Top 5

सेन्सेक्सची घोडदौड सुरूच

By admin | Updated: May 21, 2014 02:21 IST

मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सत्रादरम्यान १४ अंकांनी वधारून नव्या उच्चांकावर पोहोचला आहे.

मुंबई : मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सत्रादरम्यान १४ अंकांनी वधारून नव्या उच्चांकावर पोहोचला आहे. सलग चौथ्या सत्रात शेअर बाजारात तेजी सुरूच आहे. ३० कंपन्यांचा शेअर्सचा समावेश असलेला मुंबई शेअर बजाराचा निर्देशांक मजबुतीसह उघडला. सत्रादरम्यान बाजार २४,५८७ पर्यंत पोहोचला होता; परंतु गुंतवणूकदारांनी केलेल्या नफेखोरीमुळे बाजार खाली आला. दरम्यान बाजार एका क्षणी २४,२९९ पर्यंत खाली आला होता; परंतु सत्राअखेरीस सेन्सेक्स १३.८३ अंकांनी वधारून २४,३७६.८८ अंकांवर बंद झाला. मागील चार व्यावसायिक सत्रादरम्यान बाजार ५६२ अंकांनी मजबूत झाला. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नवे सरकार स्थापन होण्याच्या पार्श्वभूमीवर बाजारात सकारात्मक कल कायम आहे. माहिती तंत्रज्ञान आणि फार्मा क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात खरेदीचा दबाव बघायला मिळाला, तर व्यवसाय सत्रादरम्यान तेल व गॅस कंपन्यांच्या शेअर्समध्ये विक्री सुरू झाली हाती. रिलायन्स इंडस्ट्रीज आणि ओएनजीसी कंपन्यांचे शेअर्स ३.७ ते ४ टक्क्यांनी कोसळले. कोल इंडियाचा शेअरसुद्धा ५.९ टक्क्यांनी खाली आला. सोमवारच्या सत्रात कोल इंडियाचा शेअर सुधारला होता. हीरो मोटोकॉर्प, टाटा मोटर्स, मारुती सुझुकी आणि बजाज आॅटो आदींच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात नफावसुली झाल्याचे बाजारातील जाणकारांनी सांगितले. (प्रतिनिधी)