Join us  

मोठी बातमी! बँकेत अन् पोस्टात FD आहे? मग आजच जमा करा 'हे' दोन फॉर्म अन्यथा होणार मोठे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2020 8:58 AM

ठेवीदारांना मुदत ठेवीवर (एफडी) देय व्याजदरापासून टीडीएसमधून सवलत मिळावी, यासाठी फॉर्म -15जी  आणि फॉर्म 15एच पाठवावे लागतात.

नवी दिल्लीः जर आपण बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये एफडी केली असेल, तर आपल्याला आजच्या आज त्वरित 15 जी आणि 15 एच फॉर्म जमा (टीडीएस) करावा लागणार आहे अन्यथा तुमच्या नफ्यावरचा (व्याज उत्पन्नावर) टीडीएस वजा केला जाणार आहे. हा फॉर्म सादर करण्याची अंतिम तारीख 7 जुलै आहे. कर आकारणी टाळण्यासाठी हे दोन्ही फॉर्म करदाते भरत असतात. विशेष म्हणजे ते कराच्या टप्प्यात येत नाहीत. लॉकडाऊनमुळे लोकांसमोर उद्भवणार्‍या अडचणी लक्षात घेऊन केंद्रानं बँक ठेवीदारांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. ठेवीदारांना मुदत ठेवीवर (एफडी) देय व्याजदरापासून टीडीएसमधून सवलत मिळावी, यासाठी फॉर्म -15जी  आणि फॉर्म 15एच पाठवावे लागतात.प्राप्तिकर विभागाने हा फॉर्म भरण्यासाठीचा कालावधी 7 जुलैपर्यंत वाढविला आहे. एफडीवर मिळणा-या व्याजावर टीडीएस कपात होऊ नये, यासाठी दोन्ही फॉर्म भरणे आवश्यक आहे. जर ठेवीदाराने हा फॉर्म भरला नाही तर बँक व्याजाच्या रकमेवर 10% टीडीएस वजा करणार आहे. आर्थिक वर्षामध्ये एफडीवरील व्याजामुळे मिळणारे उत्पन्न एक निश्चित सीमा पार करते, त्यावेळी बँकांमध्ये तो टीडीएस स्वरूपात जमा होतो. त्यामुळे ठेवीदारांनी 15जी फॉर्म आणि 15एच फॉर्म (वरिष्ठ नागरिकांसाठी) भरून उत्पन्न करयोग्य सीमेपेक्षा कमी असल्याचं दाखवावं लागतं. खातेदारांच्या उत्पन्नावर टीडीएस कापता येऊ नये, यासाठी 15जी फॉर्म आणि 15एच फॉर्म (वरिष्ठ नागरिकांसाठी) जमा करणे गरजेचे असते. त्यामुळे आपल्या व्याजावरील टीडीएस वाचू शकतो. हा फॉार्म बँका, कॉर्पोरेट बाँड जारी करणाऱ्या कंपन्या, पोस्ट ऑफिस इत्यादींमध्ये जमा करावा लागतो. फॉर्म 15G आणि फॉर्म 15H भरण्यास उशीर झाल्यास टीडीएस कापला जातो, त्याचा रिफंड केवळ इन्कम टॅक्स रिफंड फाइल करूनच मिळवता येतो. फॉर्म 15Gचा वापर 60 वर्षांपेक्षा कमी वय असणारे भारतीय नागरिक, हिंदू अविभाजित परिवार म्हणजेच HUF किंवा ट्रस्ट करू शकतात. तर फॉर्म 15H ज्येष्ठ नागरिकांसाठी म्हणजेच 60 वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्यांसाठी असतो. या फॉर्म्सची वैधता केवळ 1 वर्ष असते. त्यामुळे प्रत्येक वर्षी ते जमा करणे आवश्यक असते. ग्राहकांना ई-सेवा, 15G/H हा पर्याय निवडावा लागेल. त्यानंतर 15एच किंवा 15जी पैकी तुमचा फॉर्म निवडा. त्यानंतर Customer Information File (CIF) No वर क्लिक करून सबमिट करा.

हेही वाचा

India China FaceOff: चीनशी युद्ध झाल्यास भारतासोबत अमेरिकेची सेनाही लढणार, व्हाइट हाऊसची मोठी घोषणा 

जगात टाळेबंदी; पोस्टात मिळतेय नोकरीची सुवर्णसंधी; 10वी पास असलेल्यांनी आजच अर्ज करा

चीनला घेरलं! दक्षिण चिनी समुद्रात अमेरिकेनं पाठवल्या दोन घातक विमानवाहू युद्धनौका

टॅग्स :सरकारी योजना