Join us  

केवळ एका क्लिकवर ३५ लाखांचे लोन मिळवा; ‘या’ बँकेची खास ऑफर; ग्राहकांना मोठा फायदा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2022 12:17 PM

मोबाइल अ‍ॅपच्या माध्यमातून कोणत्याही कागदपत्रांशिवाय आता ३५ लाखांपर्यंत लोन घेणे शक्य होणार आहे. पाहा, डिटेल्स...

नवी दिल्ली: खासगी असो किंवा सरकारी देशभरातील बँका ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी तसेच विद्यमान ग्राहकांना उत्तमोत्तम सेवेच्या ऑफर देत असतात. अशातच आता देशातील एका बड्या बँकेने आपल्या ग्राहकांसाठी विशेष ऑफर आणली आहे. या बँकेच्या अ‍ॅपमधून आता थेट ३५ लाखांपर्यंतचे कर्ज मिळवता येऊ शकते. पगारदार ग्राहकांसाठी बँकेचे प्रमुख वैयक्तिक कर्ज उत्पादन, एक्सप्रेस क्रेडिटचा आता डिजिटल पर्याय आहे. 

ग्राहकांना डिजिटली सक्षम बनवण्याच्या आणि अतिरिक्त सुविधा देण्याच्या उद्देशाने देशातील सर्वात मोठी कर्ज देणारी स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) ने योनो अ‍ॅपवर रिअल टाइम एक्सप्रेस क्रेडिट सुरू करण्याची घोषणा केली आहे. योनोद्वारे ग्राहक आता घरबसल्या आरामात RTXC चा लाभ घेऊ शकतात. हे १०० टक्के पेपरलेस आणि डिजिटल असणार आहे. यात वैयक्तिक गुंतवणूकदारांना ३५ लाखांपर्यंत कर्ज कोणत्याही कागदपत्रांशिवाय उपलब्ध होणार आहे.

क्रेडिट चेक, पात्रता, मंजुरी, कागदपत्रे आता रिअल-टाइममध्ये 

एंड-टू-एंड काही सोप्या आणि झटपट प्रक्रियांचा अवलंब करून ग्राहक याचा लाभ घेऊ शकतात. रिअल टाईम एक्‍सप्रेस क्रेडिट अंतर्गत, एसबीआय च्या केंद्र/राज्य सरकार आणि संरक्षण विभागातील पगारदार ग्राहकांना यापुढे वैयक्तिक कर्ज मिळवण्यासाठी शाखेत जाण्याची आवश्यकता नाही. क्रेडिट चेक, पात्रता, मंजुरी आणि कागदपत्रे आता रिअल-टाइममध्ये डिजिटल पद्धतीने केली जातील. कर्जासाठी अर्ज करण्यापासून कर्जाची रक्कम मिळण्यापर्यंतचा प्रवास सोपा आणि त्वरित होणार आहे. क्रिया अधिकाधिक ग्राहकांना डिजिटल बँकिंग स्वीकारण्यास देणार प्रोत्साहन देईल, असे बँकेने म्हटले आहे.

दरम्यान, आम्हाला योनोवर आमच्या पात्र पगारदार ग्राहकांसाठी रिअल टाइम एक्सप्रेस क्रेडिट कर्ज सुविधा सुरू करताना आनंद होत आहे. एक्सप्रेस क्रेडिट उत्पादन आमच्या ग्राहकांना डिजिटल, त्रास-मुक्त आणि पेपरलेस कर्ज प्रक्रिया अनुभव मिळवून देण्यास सक्षम करेल. सुलभ बँकिंगसाठी आम्ही ग्राहकांना तंत्रज्ञान प्रणित प्रगत डिजिटल बँकिंग अनुभव देण्याचा एसबीआय मध्ये सतत प्रयत्न करतो. एक्सप्रेस क्रेडिट वितरणाचे डिजिटलीकरण बँकेला प्रचंड कागदपत्रे हाताळण्याची आणि साठवण्याची गरज दूर करण्यात मदत करेल, असे 'एसबीआय'चे अध्यक्ष दिनेश खारा म्हणाले. 

टॅग्स :एसबीआयबँकिंग क्षेत्र