Join us  

SBIचा 42 कोटी ग्राहकांना झटका! बँकेनं FDवरचं व्याजदर घटवलं, जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2020 2:56 PM

SBI New Interest Rates : सरकारी बँक असलेल्या State Bank of Indiaमध्ये जर आपण एफडी (Fixed Deposit) उघडली असल्यास आपल्यासाठी महत्त्वाची बातमी आहे.

नवी दिल्लीः सरकारी बँक असलेल्या State Bank of Indiaमध्ये जर आपण एफडी (Fixed Deposit) उघडली असल्यास आपल्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. कारण एसबीआयनं एफडीवरच्या व्याजदरांमध्ये बदल केले आहेत. एसबीआयच्या या बदललेल्या व्याजदराचा लाखो ग्राहकांना फटका बसणार आहे. लाइव्ह मिंटच्या वृत्तानुसार, एसबीआयनं लागू केलेले नवे व्याजदर 10 जानेवारीला लागू झाले आहेत. बँकेनं 1 वर्षांपासून 10 वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठी असलेल्या एफडीवर 15 बीपीएसची कपात केली आहे. 7 दिवसांपासूनच्या 180 दिवसांच्या मुदतीच्या एफडीवर व्याजदरात कोणताही बदल होणार नाही. 

  • जाणून घ्या SBIचे एफडीवरील नवे व्याजदर 

>>7 दिवस ते 45 दिवसांची FD- एसबीआयच्या माहितीनुसार, आता 7 ते 45 दिवसांसाठीच्या एफडीचे नवे व्याजदर 4.5 टक्के राहतील.>>46 दिवस ते 179 दिवसांची FD- आता 46 ते 179 दिवसांच्या एफडीवर 5.50 टक्के व्याज मिळतं. >>180 दिवस ते 210 दिवसांची FD- बँक 180 दिवस ते 210 दिवसांच्या एफडीवर पहिल्यांदा 6 व्याज देत होतं. 10 सप्टेंबरपासून व्याजदरात 0.58 टक्के कपात केली आहे. >> 211 दिवस ते 1 वर्ष FD- SBIने 211 दिवस ते 1 वर्ष एफडीवरच्या व्याजदरावर 10 सप्टेंबर 0.20 टक्क्यांपर्यंत घटवलं आहे. या एफडीवर आता 5.80 टक्क्यांच्या हिशेबानं व्याज मिळणार आहे.>> 1 वर्ष ते 2 वर्ष FD- एसबीआयच्या आता 1-2 वर्षांच्या एफडीवर 6.10 टक्के व्याज मिळणार आहे.>> 2 वर्ष ते 3 वर्षांची FD- एसबीआयच्या आता 2-3 वर्षांच्या FDवर 6.10 टक्के व्याज मिळणार आहे. >> 3 वर्ष ते 5 वर्षांची FD- या एफडीवर SBI 6.10 टक्के दरानं व्याज देते.>> 5 ते 10 वर्षांची FD- या एफडीवर SBI 6.25 टक्के व्याज देते. तो आता 6.10 टक्के एवढं मिळणार आहे. 

  • वरिष्ठ नागरिकांसाठी नवे व्याजदर

>> 7 दिवस ते 45 दिवसांची एफडी- एसबीआय 7 ते 45 दिवसांच्या एफडीवर 5 टक्के व्याज देणार आहे. >> 46 दिवस ते 179 दिवसांची एफडी- एसबीआय 46 ते 179 दिवसांच्या एफडीवर 6 टक्के व्याज देणार आहे. >> 180 दिवस ते 210 दिवसांची एफडी- 180 दिवस ते 210 दिवसांच्या एफडीवर 6.30 टक्के व्याज मिळणार आहे. >> 211 दिवस ते 1 वर्षांची एफडी- एसबीआय यादरम्यान 6.30 टक्के व्याज देणार आहे. >> 1 वर्ष ते 2 वर्ष FD- एसबीआयनं आता 1-2 वर्षांच्या एफडीवर 6.60 टक्के व्याज मिळणार आहे.>> 2 वर्ष ते 3 वर्षांच्या कालावधीची FD- SBIनं आता 2-3 वर्षांच्या FDवर 6.60 टक्के व्याज मिळणार आहे. >> 3 वर्ष ते 5 वर्षांची FD- या एफडीवर SBI 6.60 टक्के दरानं व्याज देते.>> 5 ते 10 वर्षांची FD- या एफडीवर SBI 6.25 टक्के व्याज देते. तो आता 6.60 टक्के एवढं मिळणार आहे.  

टॅग्स :एसबीआयस्टेट बँक आॅफ इंडिया