Join us

SBI च्या ग्राहकांना डिजिटल पेमेंट करण्यात समस्या, सर्व्हर ठप्प की आणखी काही; केव्हा होणार सेवा सुरू?

By जयदीप दाभोळकर | Updated: April 1, 2025 14:39 IST

SBI Online Payment Issue: देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांना डिजिटल व्यवहार करण्यात अडचणी येत आहेत. यूपीआय पेमेंटसह सर्व प्रकारचे डिजिटल व्यवहार ठप्प झाल्यानं अनेक ग्राहकांना मोठ्या समस्यांना समोरं जावं लागतंय.

SBI Online Payment Issue: देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांना डिजिटल व्यवहार करण्यात अडचणी येत आहेत. यूपीआय पेमेंटसह सर्व प्रकारचे डिजिटल व्यवहार ठप्प झाल्यानं अनेक ग्राहकांना मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागतंय. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर अनेक ग्राहकांनी याबाबत तक्रारी केल्यात. स्टेट बँक ऑफ इंडियानं यावर एक प्रतिक्रिया दिली आहे. डिजिटल व्यवहारात ग्राहकांना अडचणी का येत आहेत, हे बँकेनं स्पष्ट केलंय.

एसबीआयने काय म्हटलंय?

स्टेट बँकेनं यासंदर्भात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट केली आहे. "वार्षिक देखभालीच्या कामांमुळे आमची सर्व डिजिटल सेवा १ एप्रिल रोजी दुपारी १ ते ४ या वेळेत बंद राहणार आहे. आम्ही ग्राहकांना यूपीआय लाइट आणि एटीएम चॅनेल वापरण्याची विनंती करतो," असं त्यांनी या पोस्टमध्ये नमूद केलंय. असं असलं तरी, अनेक ग्राहकांना सकाळपासूनच एसबीआयच्या माध्यमातून यूपीआय पेमेंट करण्यात अडचण येत आहे.

वॉरेन बफेंचा २८ लाख कोटींचा प्लान, जगातील सर्वात मोठे गुंतवणूकदार काय करणार?

यूपीआय लाइट म्हणजे काय?

यूपीआय लाइट ही एक नवीन डिजिटल पेमेंट प्रणाली आहे, जी एनपीसीआयनं लहान व्यवहार सुलभ आणि वेगवान करण्यासाठी विकसित केलीये. विशेष म्हणजे हे युनिफाइड पेमेंट इंटरफेसचं (UPI) लाईट व्हर्जन आहे. याच्या मदतीनं इंटरनेट कनेक्शनशिवायही पेमेंट करता येतं.

यूपीआय लाइट कसं वापरावं?

  • यूपीआय अ‍ॅपवर (जसं की फोनपे, गुगल पे, पेटीएम, भीम अ‍ॅप इत्यादी) जा.
  • यूपीआय लाइट अनेबल करा आणि आपल्या बँकेतून शिल्लक अ‍ॅड करा. (२००० रुपयांपर्यंत)
  • त्यानंतर क्यूआर स्कॅन करा किंवा मोबाइल नंबर टाकून पेमेंट करा.
टॅग्स :स्टेट बँक आॅफ इंडिया