Join us  

SBI Base Rate: एसबीआयच्या ग्राहकांना मोठा झटका! बँकेने वाढवले व्याजदर, तपासा नवीन दर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2021 5:47 PM

SBI Base Rate: बेस रेटमध्ये 10 बेसिस पॉइंट्सने वाढ करण्यात आली आहे. म्हणजेच हा नवा दर 7.55 टक्के असेल.

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक 'स्टेट बँक ऑफ इंडिया'च्या (SBI) ग्राहकांना मोठा झटका बसला आहे.  एसबीआयने व्याजदर वाढवण्याची घोषणा केली आहे. नवे दर बुधवारपासून म्हणजेच आजपासून लागू झाले आहेत. आता नवीन व्याजदर ग्राहकांना 0.10 टक्के दराने देय असतील. यासोबतच बँकेने प्राइम लेंडिंग रेट वाढवण्याचा निर्णय घेतला असून तो 10 टक्क्यांवरून 12.30 टक्के करण्यात आला आहे. तसेच, बेस रेटमध्ये 10 बेसिस पॉइंट्सने वाढ करण्यात आली आहे. म्हणजेच हा नवा दर 7.55 टक्के असेल.

ग्राहकांना मोठा झटकाबेस रेट वाढल्याने त्याचा परिणाम व्याजदरावर होणार आहे. बेस रेट वाढल्याने व्याजदर पूर्वीपेक्षा महाग होतील, त्यामुळे कर्जदारांना जास्त व्याज द्यावे लागणार आहे. दरम्यान, बेस रेट ठरवण्याचा अधिकार बँकांच्या हातात आहे. कोणतीही खाजगी किंवा सरकारी बँक बेस रेटपेक्षा कमी कर्ज देऊ शकत नाही. सर्व खाजगी आणि सरकारी बँका बेस रेटला स्टँडर्ड मानतात. याच आधारे कर्जावरील व्याज वगैरे ठरवले जाते.

मार्जिनल कॉस्टमध्ये कोणताही बदल नाहीएसबीआयने म्हटले आहे की, सर्व मुदतीच्या लेंडिंग रेटचे मार्जिनल कॉस्टमध्ये कोणताही बदल केलेला नाही. हे रेट पूर्वीप्रमाणेच राहतील. दरम्यान, गृह कर्ज क्षेत्रात एसबीआयचा मोठा वाटा आहे. एसबीआयचे मार्केटमध्ये एकूण 34 टक्क्यांवर नियंत्रण आहे. विशेष म्हणजे, एसबीआयने 5 लाख कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज वितरित केले आहे. त्याचबरोबर, 2024 पर्यंत हा आकडा 7 लाख कोटींवर नेण्याचे एसबीआयचे लक्ष्य आहे.

जाणून घ्या काय आहे बेस रेट?बँकेचा बेस रेट हा मिनिमम रेट आहे, ज्याच्या खाली कोणतीही बँक कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेला कर्ज देऊ शकत नाही. त्याआधारे बँकेच्या कर्जाचे व्याज ठरविले जाते. मात्र, याला अपवाद असू शकतो. मात्र यासंबंधीचा निर्णय बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना घ्यावा लागतो. बेस रेट म्हणजे बँक आपल्या ग्राहकांना लागू असलेला दर किंवा असे म्हणता येईल की, व्यावसायिक बँका ग्राहकाला ज्या दराने कर्ज देतात, तोच बेस रेट आहे.

गेल्या सप्टेंबर महिन्यात दरात सुधारणा झाली होतीयापूर्वी सप्टेंबर महिन्यात स्टेट बँकेच्या बेस रेटमध्ये सुधारणा करण्यात आली होती. 15 सप्टेंबरपासून बेस रेट  7.45 टक्के निश्चित करण्यात आला होता. आता नवीन बेस रेट 0.10 टक्क्यांनी वाढून 7.55 टक्के झाला आहे. तसेच, याच महिन्यात, स्टेट बँकेने बेंचमार्क प्राइम लेंडिंग रेट किंवा बीपीएलआर सुधारित केला होता आणि तो 12.20 टक्के निश्चित केला होता. रिझर्व्ह बँकेने निश्चित केलेला बेस रेट सध्या 7.30-8.80 टक्के आहे.

टॅग्स :एसबीआयस्टेट बँक आॅफ इंडिया