Join us  

SBI ATM New Rule : SBI ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! आता ATM मधून पैसे काढण्यासाठी OTP टाकावा लागेल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2021 2:57 PM

SBI ATM New Rule: आता जेव्हाही एसबीआयचे ग्राहक एटीएममधून पैसे काढण्यासाठी जातील, तेव्हा त्यांना आधी त्यांच्या मोबाईल फोनवर ओटीपी येईल. हा ओटीपी टाकल्यानंतरच ग्राहक एटीएममधून पैसे काढू शकतील.

नवी दिल्ली : स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. एसबीआयने (SBI) आपले एटीएम व्यवहार अधिक सुरक्षित करण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. दरम्यान, एसबीआयमध्ये पैसे काढण्यासाठी ग्राहकांसाठी एक नवीन नियम बनवण्यात आला आहे. यानुसार ग्राहक एसबीआयच्या एटीएममधून फक्त ओटीपीच्या (One Time Password) आधारे पैसे काढू शकतील. आता जेव्हाही एसबीआयचे ग्राहक एटीएममधून पैसे काढण्यासाठी जातील, तेव्हा त्यांना आधी त्यांच्या मोबाईल फोनवर ओटीपी येईल. हा ओटीपी टाकल्यानंतरच ग्राहक एटीएममधून पैसे काढू शकतील.

गेल्या काही दिवसांपूर्वी एसबीआय बँकेने ट्विटरवर ट्विट करून ही माहिती दिली होती. यावेळी एसबीआयने म्हटले होते की, एसबीआय एटीएममधील व्यवहारांसाठी आमची ओटीपी आधारित कॅश विड्राल सिस्टम फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध एक लसीकरण आहे. तसेच, कोणत्याही प्रकारची फसवणूक किंवा फसवणूक, यापासून तुमचे संरक्षण करणे ही आमची पहिली प्राथमिकता असेल, असेही एसबीआयने म्हटले होते. 

असे काम करते ओटीपी आधारित कॅश विड्राल सिस्टम - तुमच्या एसबीआय खात्यातून पैसे काढण्यासाठी तुम्हाला OTP ची आवश्यकता असेल. पैसे काढण्यासाठी तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर OTP पाठवला येईल. OTP हा 4 अंकी क्रमांक असेल जो ग्राहकाला पैसे काढताना टाकावा लागेल.- त्यामुळे आता तुम्हाला एटीएममध्ये काढायची असलेली रक्कम टाकल्यावर तुम्हाला एटीएमच्या स्क्रीनवर OTP टाकण्यास सांगितले जाईल. तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर बँकेकडून OTP येईल. आता तुम्हाला रोख काढण्यासाठी या स्क्रीनवर बँकेने पाठवलेला OTP टाकावा लागेल.OTP टाकून एटीएममधून पैसे काढल्यास तुमची फसवणूक होणार नाही.

ग्राहकांना फसवणुकीपासून वाचवण्यासाठी निर्णयएसबीआयने 10,000 किंवा त्याहून अधिक रक्कम काढण्यासाठी हा नवीन नियम लागू केला आहे. म्हणजेच, जर एससीआयच्या ग्राहकांना त्यांच्या बँक खात्यातून 10000 रुपये किंवा त्याहून अधिक रोख काढायचे असतील, तर त्यांना OTP आधारित रोख पैसे काढण्याच्या पद्धतीद्वारे पैसे काढावे लागतील. एसबीआयने आपल्या ग्राहकांना कोणत्याही प्रकारच्या फसवणुकीपासून वाचवण्यासाठी या दिशेने हे पाऊल उचलले आहे.

टॅग्स :एसबीआयस्टेट बँक आॅफ इंडिया